जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनसह पन्नास माजी सैनिक संघटनांचे अण्णा हजारे यांना निवेदन
अण्णांनी माजी सैनिकांना राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करावा -शिवाजी पालवे
अहमदनगर (प्रतिनिधी)- आजी-माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षक मतदार संघ प्रमाणे सैनिक मतदार संघ निर्माण करुन लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एक लोकप्रतिनिधीसाठी राजकीय आरक्षण मिळण्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याच्या मागणीचे निवेदन जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यातील पन्नासहून अधिक सैनिक संघटनांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना दिले. यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे, निवृत्ती भाबड, शिवाजी गर्जे, संदीप गट, सहदेव घनवट, अंबादास तरटे, मारुती पोटघन, संतोष तरटे, रावसाहेब भोर, संतोष तरटे, युवराज गांगवे, संतोष दिवटे, कानिफनाथ खंडागळे, संतोष पागीरे, दत्तू गांगवे, नारायण कोल्हे, विकास झिंजुर्डे, भाऊसाहेब गवळी, नारायण कोल्हे, रामदास घोडके आदींसह माजी सैनिक यावेळी उपस्थित होते.
राज्यात आजी-माजी सैनिकांचे अनेक प्रश्न प्रलंबीत आहे. ते प्रश्न शासनस्तरावर सोडविण्यासाठी त्यांच्यामधील लोकप्रतिनिधी असणे आवश्यक आहे. या मागणीसाठी राज्यातील सर्व आजी-माजी सैनिक व संघटना प्रयत्नशील आहेत. सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सात विभागांमध्ये सात सैनिक आमदार, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका तसेच विधानसभा व लोकसभेत एक सदस्य माजी सैनिकांमधून घेऊन राजकीय आरक्षण मिळण्याची मागणी जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनसह अमर जवान माजी सैनिक बहुउद्देशीय संस्था अकोले, सैनिक कल्याण सेवाभावी संस्था नाशिक, माजी सैनिक कल्याणकारी मंडळ करमाळा, माजी सैनिक कल्याण मंडळ उदगीर लातूर, भारतीय पूर्व सैनिक संघ आर्वी वर्धा, वाळवा तालुका माजी सैनिक संघटना सांगली, माजी सैनिक कल्याण संघटना हवेली पुणे, माजी सैनिक संघ रत्नागिरी चिपळूण तालुका संघ, माजी सैनिक संघ चिपळूण रत्नागिरी, माजी सैनिक संघटना कटोल नागपूर, बागलान सैनिक संघ सटाणा नाशिक, माजी सैनिक विकास समिती नांदेड, शक्ती आजी माजी सैनिक संघटना टाकळी खातगाव ,रोकडिया आजी माजी सैनिक सेवा संस्था बाबुर्डी , त्रिदल सैनिक संघ गुंडेगाव, श्री हनुमान माजी सैनिक संस्था गटेवाडी, पिर साहेब आजी माजी सैनिक सेवा संस्था घाणेगाव, जय हिंद सैनिक सेवा फौंडेशन पारनेर, आजी माजी सैनिक सेवा संस्था बुरूडगाव, सैनिक शैक्षणिक व क्रीडा संघ पारनेर, आजी-माजी सैनिक सेवा संस्था पळवे खुर्द, श्री ढोकेश्वर सैनिक फाउंडेशन टाकळी ढोकेश्वर, जय मल्हार सैनिक सेवा संस्था आपधुत, जय जवान आजी-माजी सैनिक सेवा संस्था म्हसणे, जय हिंद माजी सैनिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नवनागापूर, विक्रांत आजी माजी सैनिक सेवा संस्था चास, भैरवनाथ आजी माजी सैनिक संस्था भोयरे पठार, राहुरी तालुका माजी सैनिक सेवा संस्था देवळाली, सैनिक कल्याण समिती संगमनेर, स्वराज्य सैनिक कल्याण संस्था संगमनेर, कोळाईदेवी आजी-माजी सैनिक बहुउद्देशीय सेवा संघ कोळगाव, श्रीगोंदा एक्स सर्विस मॅन असोशियन कोपरगाव, प्रहार सैनिक कल्याण संघ महाराष्ट्र राज्य अकोले तालुका, माजी सैनिक संघ अकोले, राहता तालुका माजी सैनिक सेवाभावी संस्था, जामखेड तालुका माजी सैनिक असोशियन, माजी सैनिक प्रतिष्ठान अकोळनेर, जय हनुमान आजी-माजी सैनिक सेवा संस्था पाडळी रांजणगाव, श्री काळभैरव नाथ आजी माजी सैनिक सेवा संस्था जातेगाव, श्रीरामपूर तालुका माजी सैनिक सेवा संस्था, जय जवान नेवासा तालुका माजी सैनिक संघ, जय जवान आजी-माजी सैनिक सेवा फाउंडेशन कर्जत, कामरगाव आजी-माजी सैनिक सेवाभावी संस्था, भैरवनाथ माजी सैनिक सेवा संघ बेलवंडी श्रीगोंदा, फर्स्ट मराठा जंगी फलटण माजी सैनिक कल्याणकारी प्रतिष्ठान बेळगाव, माजी सैनिक कल्याणकारी बहुद्देशीय सेवाभावी संस्था गंगाखेड परभणी, शंभूराजे सैनिक संस्था देवदैठण, तिरंगा माजी सैनिक सेवा संघ नेवासा या संघटनांनी केली आहे.