ऑल इंडिया लिनेस क्लब गोदातरंग व राजामाता क्लब ऑफ अहमदनगरचा संयुक्त उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- ऑल इंडिया लिनेस क्लब (एमएच 3 डिस्ट्रीक्ट) गोदातरंग व राजामाता क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने महाशिवरात्र व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त कुष्ठधाम मधील वृध्दांना फळांचे वाटप करण्यात आले.
यावेळी लिनेसचे डिस्ट्रीक कॅबिनेट ऑफीसर लतिकाताई पवार, क्लबच्या अध्यक्षा शर्मिलाताई कदम, सचिव मिनाक्षी जाधव, खजिनदार अजिता ऐडके, शांताताई ठुबे, सविता जोशी, लताताई मुथा, पूजा मुथा आदी महिला सदस्या उपस्थित होत्या.

क्लबच्या अध्यक्षा शर्मिला कदम म्हणाल्या की, लिनेस क्लब समाजात समानता व आपुलकीने गरजूंना आधार देण्याचे काम करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने समाजातील दुर्लक्षीत घटकांबरोबर महिलांनी महाशिवरात्री साजरी केली असल्याचे स्पष्ट करुन कुष्ठरोगाविषयी असलेल्या गैरसमजबद्दल मार्गदर्शन करुन रुग्णांना आपुलकी व प्रेम देण्याचे आवाहन केले.
कॅबिनेट ऑफीसर लतिकाताई पवार म्हणाल्या की, वंचितांना मदतीबरोबर प्रेम व आपुलकीची गरज असते. समाजापासून दुरावलेल्यांना मदतीबरोबर मायेचा आधार देण्याचा प्रयत्न लिनेसचा कायम राहिलेला आहे. आर्थिक मदतीने फक्त भौतिक सुविधा पुरविल्या जाऊ शकतात. यामध्ये मायेचा ओलावा असल्यास, ती मदत सत्पात्री ठरत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
