अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील सुमनबाई सिताराम तोडमल यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 77 वर्षाच्या होत्या. धार्मिक व मनमिळावू स्वभावामुळे ते सर्वांना सुपरिचित होत्या. त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्या जय हरी नावाने परिचित होत्या.
त्यांच्या पार्थिवावर शुक्लेश्वर मंदिर जवळील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे, सर्जेराव तोडमल, विलास तोडमल, विजय तोडमल यांच्या त्या मातोश्री होत्या.