गाडगे महाराजांनी स्वच्छतेतून सेवाभाव त्यांनी जगाला दिला -संजय सपकाळ
अहमदनगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने संत गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्त भिंगार येथील भगवान गौतम बुध्द जॉगिंग पार्क परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानाद्वारे स्वच्छतेतून निरोगी आरोग्य व समृध्दीचा जागर करीत, झाडे लावा.. झाडे जगवा… आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
संत गाडगे महाराज यांना अभिवादन करुन स्वच्छता मोहिमेस प्रारंभ करण्यात आले. या अभियानात ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, सुभाष नाबरिया, दिपक बडदे, मेजर दिलीप ठोकळ, विकास भिंगारदिवे, सुधाकर चिदंबर, सचिन चोपडा, मनोहर दरवडे, दिपक घोडके, श्रीरंग देवकुळे, सर्वेश सपकाळ, नितीन कवडे, वृषभ जावळे, अशोक पराते, सरदारसिंग परदेशी, जालिंदर अळकुटे, महेश सरोदे, माजिद शेख, अभिजीत सपकाळ, प्रविण परदेशी, विशाल बोगावत, सविता परदेशी, मनिषा बोगावत, पांडूरंग अटकर, अमोल सपकाळ, बापू तांबे, अब्बास शेख, संदीप शिंगवी आदी सहभागी झाले होते.
संजय सपकाळ म्हणाले की, गाडगे महाराजांनी समाजात स्वच्छतेचा जागर करीत निरपेक्ष लोकसेवा केली. समाजसुधारणेसाठी व लोकशिक्षणासाठी त्यांनी कीर्तनातून समाजप्रबोधन केले. स्वच्छतेतून सेवाभाव त्यांनी जगाला दाखवून दिला. पारंपारिक रुढी, परंपरा व अंधश्रध्देला फाटा देत गाडगे महाराजांनी बहुजन समाजात परिवर्तनाची ज्योत पेटवली. स्वच्छतेचे महत्त्व त्यांनी त्या काळात पटवून दिले. आज निरोगी वातावरणासाठी सार्वजनिक स्वच्छता महत्त्वाची झाली असल्याचे त्यांनी सांगितले. तर हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने सुरु असलेल्या वृक्ष रोपण व संवर्धन मोहिमेची माहिती देऊन उन्हाळ्यात लावलेली झाडे जगविण्यासाठी नियोजन करण्यात आले. या स्वच्छता अभियानात जमा झालेल्या कचर्याची विल्हेवाट लावण्यात आली.