• Fri. Sep 19th, 2025

पी.ए. इनामदार स्कूलचे दहावी बोर्डाच्या परीक्षेत यश

ByMirror

Jun 3, 2023

मिसबा तांबोळी शाळेच्या गुणवत्ता यादीत प्रथम

आफताब शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- इकरा एज्युकेशन अ‍ॅण्ड वेलफेअर सोसायटी संचलित मुकुंदनगर येथील पी.ए. इनामदार स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी (एसएससी) बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन केले. शाळेचा 96.49 टक्के निकाल लागला आहे. 30 विद्यार्थी विशेष प्राविण्यात तर 61 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.


शाळेच्या गुणवत्ता यादीत प्रथम मिसबा समीर तांबोळी (89.40 टक्के), द्वितीय- जोया आसिफ खान (89.20 टक्के) व तृतीया- लिजा शारिया साजिद बागवान (88.40 टक्के) येण्याचा बहुमान पटकाविला.

या गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेत सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे चेअरमन अब्दुल रहिम खोकर, व्हाईस चेअरमन इंजि. इकबाल सय्यद, प्राचार्य हारुन खान, उपप्राचार्या फरहाना शेख, मुशीर आलम, संतोष जाधव, राजश्री गायकवाड आदी शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे सचिव विकार काझी व खजिनदार डॉ. खालिद शेख यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *