• Mon. Jan 13th, 2025

निमगाव वाघाचे रंगनाथ पाचारणे यांचे वृद्धापकाळाने निधन

ByMirror

Aug 19, 2022

अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील रंगनाथ विठ्ठल पाचारणे यांचे (वय 83 वर्षे) गुरुवारी (दि.18 ऑगस्ट) रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते अत्यंत मनमिळावू, कष्टाळू व धार्मिक स्वभावाचे असल्याने सर्वांना सुपरिचित होते.

अशिक्षित असताना त्यांनी बिकट परिस्थितीतही अनेक गरजू घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे. त्यांचा मोठा मुलगा पुंडलिक पाचारणे जिल्हा बँक जखणगाव शाखेत कॅशियर व लहान मुलगा अहमदनगर महापालिकेत कार्यरत आहे. त्यांचा अंत्यविधी गावातील अमरधाममध्ये शोकाकुळ वातावरणात झाला. त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *