• Fri. Sep 19th, 2025

नगरचे सीए शंकर अंदानी यांना ब्रॅण्ड ऑफ महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार प्रदान

ByMirror

May 10, 2023

कोल्हापूर येथील धम्म चॅरिटेबल ट्रस्ट सेक्युलर प्रोगेसिव्ह फ्रंट संस्थेच्या वतीने सन्मान

अंदानी यांची ग्रंथ तुला करुन लाख रुपयांची पुस्तके गरजू व अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी भेट

अहमदनगर (प्रतिनिधी)- समाज कार्यात वाहून घेतलेल्या व धम विचाराचे प्रसार करुन निस्वार्थपणे योगदान देणार्‍या व्यक्तीला दरवर्षी कोल्हापूर येथील धम्म चॅरिटेबल ट्रस्ट सेक्युलर प्रोगेसिव्ह फ्रंट संस्थेच्या वतीने ब्रॅण्ड ऑफ महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो. मानाचा समजला जाणारा या वर्षीचा ब्रॅण्ड ऑफ महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार नगरचे सीए शंकर घन्शामदास अंदानी यांना प्रदान करण्यात आला.


कोल्हापूर येथील राजश्री शाहू स्मारक भवन येथे धाम विचारक माजी खासदर जोगेंद्र कवाडे, मराठी चित्रपट अभिनेते मिलिंद शिंदे, जेष्ठ विचारवंत सुरेश वाघमारे, प्रा. किसनराव कुर्‍हाडे, बचाराम कांबळे, करुणा विमल, अनिल म्हमाणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अंदानी यांना सदर पुरस्काराने गौरविण्यात आले. भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त एक दिवसीय सत्यशोधक धम्म परिषदचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी धम्म विचारवंतांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.


मानपत्र, रुपय दहा हजार रुपये रोखं, पंधरा हजार रुपयांची साहित्य पुस्तके असे या पुरस्काराचे स्वरुप होते. तर या कार्यक्रमात अंदानी यांची ग्रंथ तुला करण्यात आली. ग्रंथ तुलेतील तब्बल एक लाख रुपये किमतीची विविध पुस्तके अंदानी यांनी गरजू व अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी भेट दिली. तर पुरस्काराची रोख रक्कम भगवान गौतम बुध्द यांच्या जीवनावर चित्रपट बनविणारे फिल्म क्लब संस्थेला देणगी देण्यात आली.


उपस्थित पाहुण्यांनी अंदानी यांच्या सामाजिक कार्य, मनाचा मोठेपणा व उदारतेचे कौतुक करुन निस्वार्थ भावनेने योगदान देणारे थोड्याच लोकांमुळे समाज सावरला असल्याचे सांगितले. तर अंदानी यांचे व्यक्तीमत्व समाजासाठी आदर्श व प्रेरणा देणार असल्याचे स्पष्ट केले.


सि.ए. शंकर अंदानी हे मागील अनेक वर्षा पासून समाज कार्य करीत आहेत. तब्बल 364 मंदिर, धर्म शाळा, सामाजिक संस्था, चर्च, मस्जिद आदी सामाजिक संस्थांचे लेखापरीक्षणाचे कार्य ते मागील पंधरा वर्षापासून सेवाभावाने करत आहे. विविध सामाजिक संस्थांना मार्गदर्शन करून त्यांचे आर्थिक दप्तर योग्य रित्या कसे ठेवावे व कागदपत्रे शासकीय कार्यालयात सादर करण्यासाठी ते मार्गदर्शन करत आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना सदरचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.


अंदानी हे सिए असून, श्री साई बाबा संस्थान ट्रस्ट (शिर्डी) व अहमदनगर महापालिका यांचे ते मागील चौदा ते पंधरा वर्षापासून कर सल्लागार आहेत. तसेच अनेक शासकीय व बँक यांचे ते लेखा परीक्षक व कर सल्लागाराचे काम पाहत आहेत. त्यांना यापूर्वी युनायटेड नेशन अमेरिका राष्ट्राध्यक्ष कार्यालयाकडून मेडल ऑफ एक्सलन्स (उत्कृष्ट सेवा कार्य) हा सर्वोच्च आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तसेच त्यांची इंडिया बुक ऑफ रेकार्ड व आशिया बुक ऑफ रेकार्डसह एकूण 41 जागतिक रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली आहे. तर जवळपास त्यांना दीड हजारपेक्षा जास्त राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कर मिळाले आहेत.


पुरस्कार मिळाल्याबद्दल अंदानी यांचे खासदार सदाशिव लोखंडे, आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप, आमदार निलेश लंके, आमदार रोहित पवार, माजी आमदार विजय औटी, महापौर रोहिणी शेंडगे, मनपा आयुक्त पंकज जावळे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, बाबासाहेब वाकळे, सुरेखा कदम, शिवसेनेचे शहराध्यक्ष संभाजी कदम, हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, दत्ता कावरे, परेश लोखंडे, संजय चोपडा, अहमदनगर सिधी समाजाचे अध्यक्ष महेश मध्यान आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *