• Sun. Jan 26th, 2025

जिल्ह्यातील शिक्षण व साखर सम्राटांनी शहराच्या विकासाचा विचार केला नाही -आमदार संग्राम जगताप

ByMirror

Jun 16, 2022

झेंडीगेट येथे आ. अरुणकाका जगताप सांस्कृतिक सभागृहाचा लोकार्पण

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील शिक्षण व साखर सम्राटांनी शहरात येऊन फक्त उद्घाटने केली. आपले तालुके व मतदार संघ सांभाळली, मात्र शहराच्या विकासाचा विचार केला नाही. मतदारसंघ नसलेले पुढारी शहरात फक्त निवडणुकीपुरते येत असून, त्यांचा शहराच्या विकासासाठी योगदान काय? हा प्रश्‍न विचारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.


शहरातील झेंडीगेट येथील शाळा नं.4 मध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या विकास निधीतून हाजी मुजाहिद कुरेशी (भा) यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या आ. अरुणकाका जगताप सांस्कृतिक सभागृहाचा लोकार्पण करण्यात आला. यावेळी अध्यक्षीय भाषणात आमदार जगताप बोलत होते. या लोकार्पण सोहळ्यासाठी उपमहापौर गणेश भोसले, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, स्थायी समितीचे सभापती कुमारसिंह वाकळे, माजी सभापती अविनाश घुले, उद्योजक हाजी शौकत तांबोली, नगरसेवक समद खान, विनीत पाऊलबुध्दे, निखील वारे, संपत बारस्कर, हाजी वाजीद जहागीरदार, अमोल गाडे, बाळासाहेब पवार, सुनिल त्र्यंबके, आसिफ सुलतान, सचिन जाधव, महापालिकेचे सुरेश इथापे, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे साहेबान जहागीरदार, ओबीसी सेलचे अमित खामकर, भिंगार शहराध्यक्ष संजय सपकाळ, शम्स खान, आरिफ शेख, वाहिद कुरेशी, हाजी मुख्तार कुरेशी, हाजी गयाज कुरेशी, अख्तर कुरेशी, मुनाफ कुरेशी, मोहसीन कुरेशी, हाजी शाकिर, रफिक मुन्शी, मुस्तफा पैलवान, दादू सुभेदार, सईक सय्यद, आरिफ सय्यद, शोएब खान, नवेद शेख, शाहिद सिमला, अदनान सय्यद, अकील शेख आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.


आमदार जगताप पुढे म्हणाले की, शहरात कोणाचीही अडवणूक न करता विकासकामे व लोकार्पण सोहळे होत आहे. रामचंद्र खुट येथील रस्ता करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. परंतु अत्यावश्यक कामे न थांबवता, नागरिकांच्या सोयीसाठी कामे मार्गी लावण्यात आली. झेंडीगेट येथील सभागृहासाठी मुजाहिद कुरेशी यांचा सातत्याने पाठपुरावा राहिला. या सभागृहाच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबाच्या विविध कार्यक्रमांची सोय होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर शहरा लगत असलेले उपनगरे झपाट्याने वाढत असतांना रस्त्यांचे जाळे निर्माण करण्याचे कार्य सुरु आहे. तात्पुरता विचार न करता भविष्यातील तीस ते चाळीस वर्षांचा विचार करून विकास कामे केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. तर मुकुंदनगर भागातील नागरिकांसाठी एक सभागृह उभारण्याचा सूतोवाच केला.


प्रास्ताविकात साहेबान जहागीरदार यांनी झेंडीगेट भागातील अल्पसंख्यांक समाजाला सभागृहाची अत्यंत गरज होती. लग्नसमारंभ व इतर घरगुती कार्यक्रमासाठी खर्चिक मंगल कार्यालये परवडत नव्हते. मात्र सर्वसामान्यांचा विचार करुन आमदार संग्राम जगताप यांनी हा प्रश्‍न सोडविला आहे. शहरात विकासपर्व सुरु असून, हा विकास एका पुस्तकापुरता मर्यादीत नाही. लवकरच इतर विकासकामे घेऊन संग्रामपर्व 2 देखील नगकरांसाठी येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रफिक मुन्शी म्हणाले की, अल्पसंख्यांक समाजाला आवश्यक असणारी सभागृहाची नितांत गरज आमदार संग्राम जगताप यांनी भागवली आहे. या सभागृहात कौटुंबिक सोहळे होत असताना विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन म्हणून देखील सभागृहाचा उपयोग केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मौलाना शफीक कासमी यांनी सर्वसामान्यांना लग्नासाठी लाखो रुपये देऊन सभागृह घेणे परवडत नव्हते, यासभागृहाने अनेकांची सोय होणार असल्याचे सांगितले.


हाजी शौकत तांबोळी म्हणाले की, झेंडीगेट परिसराचा कायापालट करण्यासाठी मुजाहिद कुरेशी यांनी सातत्याने योगदान दिले. त्यांना आमदार जगताप यांचे सहकार्य मिळाल्याने या प्रभागाचा विकास झाला. या भागातील उघड्या गटारी, अस्वच्छता व रस्त्यांचे प्रश्‍न त्यांनी मार्गी लावल्याचे त्यांनी सांगितले. अविनाश घुले यांनी विकासात्मक कार्यातून शहराला शहराचेरुप देण्याचे कार्य सुरु आहे. आमदार जगताप यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करुन शहरासह उपनगरांचा विकास साधला असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उध्दव काळापहाड यांनी केले. आभार अल्ताफ कुरेशी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *