सामाजिक कार्याची दखल घेऊन पुरस्काराने गौरव
अहमदनगर (प्रतिनिधी)- जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीने सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल विजय भालसिंग यांना समाज सेवारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

शहरात जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे एक दिवसीय शिबिर पार पडले. यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर यांच्या हस्ते भालसिंग यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय सल्लागार अॅड. गजानन ठाकरे, महाप्रदेश अध्यक्ष राम घरत, राज्य प्रभारी अध्यक्ष ह.भ.प. वाल्मिक महाराज जाधव, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली सोनवणे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष ह.भ.प. रोहिदास महाराज जाधव आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
विजय भालसिंग निस्वार्थ भावनेने सामाजिक योगदान देत असून, त्यांचे सामाजिक कार्य सुरु आहे. एस.टी. बँकेची नोकरी सांभाळून गरजू घटकांची ते मदत करत आहेत. वंचितांच्या न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी देखील त्यांचे कार्य सुरु असून, या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना समाज सेवारत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. राष्ट्रीय महासचिव राजेंद्र मोरे यांच्यासह जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या राज्य कार्यकारणीच्या पदाधिकार्यांनी भालसिंग यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.