शहर हरित व सुंदर बनविण्यासाठी वृक्ष लागवड ही लोकचळवळ व्हावी -न्यायाधीश नेत्राजी कंक
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहर हरित व सुंदर बनविण्यासाठी वृक्ष लागवड ही लोकचळवळ होण्याची गरज आहे. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवड करुन, त्याचे संगोपन करणे काळाची गरज बनली आहे. जुने व नवीन न्यायालयाच्या आवारात वकिलांनी वृक्ष रोपण व संवर्धनाचे केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश नेत्राजी कंक यांनी केले.

जागतिक पर्यावरण दिना निमित्त कौटुंबिक न्यायालय अहमदनगर व कौटुंबिक न्यायालय वकील बार असोसिएशनच्या वतीने कौटुंबिक न्यायालयाच्या आवारात वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले. यावेळी न्यायाधीश कंक बोलत होत्या. यावेळी कौटुंबिक न्यायालयाच्या समुपदेशक सुषमा बिडवे, बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. शिवाजीराव कराळे, उपाध्यक्ष अॅड.एल.बी. कचरे, सचिव अॅड. अनिता दिघे, खजिनदार अॅड. राजेश कावरे, सहसचिव अॅड. अर्चना सेलोत, जेष्ठ विधीज्ञ अॅड. आर.पी. सेलोत, अॅड. सत्यजीत कराळे, अॅड. शिवाजी सांगळे, अॅड. मच्छिद्र अंबेकर, अॅड. राजाभाऊ शिर्के, अॅड. अनुराधा येवले, अॅड.सुचीता बाबर आदी वकील मंडळीसह न्यालयीन अधिक्षक जी.डी. जोशी, शेखर मेहत्रे, श्रीमती बगाडे, श्रीमती जाधव, चौधरी, पोकळे, उपस्थित होते.
बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. शिवाजीराव कराळे यांनी वकीलांचा सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार राहिलेला आहे. पर्यावरण संवर्धनासाठी वकील मंडळी वृक्षरोपण व संवर्धन चळवळीत योगदान देत असून, न्यायालयाचे आवार हिरवाईने फुलविण्यासाठी या चळवळीत भरीव योगदान राहणार असल्याचे सांगितले.