अहमदनगर (प्रतिनिधी)- जनकल्याण शिक्षण प्रसारक मंडळ अहमदनगर संचलित सारसनगर येथील कै. दामोधर विधाते (मास्तर) माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी (एसएससी) बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल 91.42 टक्के लागला.
शाळेच्या गुणवत्ता यादीत प्रथम- मधुरा नागेश आरे (80.80 टक्के), द्वितीय- समर्थ रामराव मिसाळ (77.20 टक्के), तृतीय- प्राजक्ता संजय मिश्रा (76.80 टक्के) येण्याचा बहुमान पटकाविला. विद्यालयात विशेष प्राविण्यात 4, प्रथम श्रेणीत 10, तर द्वितीय श्रेणीत 18 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे विश्वस्त बाळासाहेब (अण्णा) विधाते, रामदास कानडे व संस्था सरचिटणीस प्रा. शिवाजीराव विधाते, विद्यालयाचे मुख्याध्यापक व मार्गदर्शक शिक्षकांनी अभिनंदन केले.