सगळ्या आजारांचे मूळ कारण म्हणजे चुकीची आहार पध्दती आणि व्यायामाचा अभाव -येणारे
अहमदनगर (प्रतिनिधी)- व्ही.आर.डी. येथील केंद्रीय विद्यालयात आहार तज्ञ ज्योती विजयकुमार येणारे यांनी निरोगी व सदृढ आरोग्यासाठी आहार व व्यायाम या विषयावर मार्गदर्शन केले. धकाधकीच्या काळात स्वतःची काळजी कशी घ्यावी व व्यायामाला वेळ कसा द्यावा? याबद्दल सविस्तर सांगितले.
सगळ्या आजारांचे मूळ कारण म्हणजे चुकीची आहार पध्दती आणि व्यायामाचा अभाव आहे. यामुळे अनेक आजार व विकार युवक, महिला व विद्यार्थ्यांना देखील जडत असल्याचे ज्योती येणारे यांनी सांगितले. स्वतःचा योग्य सकस आहार स्वतः कसा बनवता येईल आणि घरगुती पद्धतीने व्यायाम कसा करता येईल हे त्यांनी समजून सांगितले. विद्यार्थ्यांना व्यायामाचा फायदा मानसिक एकाग्रता व मन प्रसन्नतेसाठी होत असतो. योग्य आहार व व्यायामामुळे विद्यार्थ्यांची सर्वांगीन प्रगती देखील होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय विद्यालयाच्या प्राचार्या सविता यादव यांनी आहार तज्ञ ज्योती येणारे यांचा सत्कार केला. यावेळी प्रीती मॅम, वृषाली मॅम, सम्राट सर, अतुल सर, वाकोडे मॅम, धाकतोडे सर, नितीन सर, बगाडे मॅम, शीतल बोरा आदी उपस्थित होते. आभार प्रीती रॉय यांनी मानले.