साध्या घरात घेतला पाहुणचार
जुन्या आठवणींना दिला उजाळा
अहमदनगर (प्रतिनिधी)- केद्रीय समाजकल्याण मंत्री व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदास आठवले यांनी रिपाईचे उत्तर महाराष्ट्र सचिव तथा माजी नगरसेवक अजय साळवे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
साळवे यांच्या साध्या घरात पाहुणचार घेऊन ना. आठवले यांनी कुटुंबीयांची आस्थेने चौकशी केली. तर नगरकरांशी जुडलेल्या जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.

अजय साळवे, मुलगा निखिल साळवे, सुन सायली साळवे, प्रा. प्रशांत साळवे, अनुराधा साळवे, प्रज्ञा साळवे यांनी ना. आठवले यांचे स्वागत केले. यावेळी सगिता खडागळे, प्रियंका पाटोळे, मोहन खंडागळे, अविनाश शिंदे, शांताबाई साळवे, कुसुम साळवे, वर्षा गायकवाड, विकी साळवे, युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, संजय भैलुमे, राजु जगताप, दया गजभिवे, सुनिल साळवे, गौतम घोडके, जिवा घोडके, शशिकांत पाटील, रविराज साळवे, प्रा.जयंत गायकवाड, सुमेध गायकवाड, वैभव कांबळे आदी उपस्थित होते.
नुकतेच लग्न झालेले साळवे यांचे चिरंजीव निखिल व सुन सायली साळवे यांना आठवले यांनी आशिर्वाद दिले. अजय साळवे व प्रा. प्रशांत साळवे यांनी ना. आठवले यांचा सत्कार करुन आभार मानले. यावेळी आठवले यांना भेटण्यासाठी गौतमनगर मधील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
