• Fri. Jan 30th, 2026

अहमदनगर मध्ये जिओ ची फाईव्हजी सेवा सुरु

ByMirror

Jan 17, 2023

सुपर फास्ट सर्व्हिससाठी जिओची फाईव्ह जी सेवा उपयुक्त -अल्ताफ सय्यद

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिओची फाईव्ह जी सेवा आता अहमदनगर मध्ये सुरू करण्यात आली आहे. जिओने देशातील दहा शहरात ही सेवा लॉन्च केली असून, यामध्ये अहमदनगरचा देखील समावेश असल्याची माहिती जिओचे सदस्य अल्ताफ सय्यद यांनी दिली.


रिलायन्स जिओने आग्रा, कानपूर, मेरठ, प्रयागराज (उत्तर प्रदेश), तिरुपती, नेल्लोर (आंध्र प्रदेश), कोझिकोड, त्रिशूर (केरळ), नागपूर, अहमदनगर (महाराष्ट्र) या दहा शहरांमध्ये सेवा सुरु केली आहे.

इंटरनेट ही सर्वसामान्यांची गरज झाली असताना, सुपर फास्ट सर्व्हिस नागरिकांना मिळण्यासाठी जिओची फाईव्ह जी सेवा नागरिकांना उपयुक्त ठरणार असल्याचे सय्यद यांनी म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *