कौटुंबिक न्यायालय वकील संघाच्या वतीने सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्ह्याचे प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लागड्डा यांची अमरावती येथे बदली झाली असता, कौटुंबिक न्यायालय वकील संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करुन निरोप देण्यात आला.
या निरोप कार्यक्रमाप्रसंगी कौटुंबिक न्यायालय वकील संघाचे अध्यक्ष ॲड. लक्ष्मण कचरे, उपाध्यक्ष ॲड. सुरेश लगड, सचिव ॲड. राजेश कावरे, माजी अध्यक्ष ॲड. शिवाजी (आण्णा) कराळे, ॲड. अनिता दिघे, ॲड. प्रणाली भूयार-चव्हाण, ॲड. गौरी सामलेटी, ॲड. विजया कोतकर, ॲड. विराज लगड आदी उपस्थित होते.
उपस्थित वकिलांनी प्रधान जिल्हा न्यायाधीश यार्लागड्डा यांच्या कारकिर्दीतील जुन्या आठवणींना उजाळा दिला व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.