नगर (प्रतिनिधी)- येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांनी 2017 साली एका प्रकरणात आरोपीने एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एक वर्ष सश्रम कारावास आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती. यावर अपिलीय न्यायालयात युक्तीवाद होऊन आरोपीला पूर्वीचे शिक्षेच्या आदेशातून निर्दोष मुक्तता केली आहे.
2017 साली आरोपीने एका महिलेचा विनयभंग केला आणि तिला धमकावल्याप्रकरणी भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 354 आणि 506 (1) प्रमाणे आरोपीला दोषी धरले होते. सदरील प्रकरणात आरोपीला एक वर्ष सश्रम कारावास आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती.
सदरील न्याय निर्णय बाबत आरोपीने अहमदनगर येथील जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले होते. याप्रकरणी आरोपीच्या वतीने ॲड. आशिष एस. सुसरे यांनी युक्तीवाद केला. 21 ऑक्टोबर रोजी अपिलात युक्तिवाद होऊन प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयाने 22 ऑक्टोबर 2024 रोजी खुल्या न्यायालयात न्याय निर्णय घोषित करताना, प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब यांनी आरोपीस पूर्वी सुनावलेल्या शिक्षेच्या आदेशातून आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपीच्या वतीने ॲड. आशिष सुसरे यांनी काम पाहिले.