• Fri. Oct 11th, 2024

कौटुंबिक न्यायालय, औद्योगिक, कामगार व सहकार न्यायालयाची प्रकरणे लोकअदालतमध्ये तडजोडीने निकाली

ByMirror

Oct 1, 2024

प्रकरणांचा निपटारा होण्यासाठी लोकअदालत काळाची गरज -प्रधान न्यायाधीश अंजू शेंडे

दोनशे वर्ष पूर्ण झालेल्या जुन्या न्यायालयाच्या ऐतिहासिक इमारतीची प्रधान न्यायाधीशांकडून पहाणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील कौटुंबिक, कामगार, सहकार व औद्योगिक न्यायालयात आयोजित लोकअदालतमध्ये तडजोडीने निकाली काढण्यात आली. या लोकअदालतचे उद्घाटन न्यायमुर्ती राम शास्त्री प्रभुणे यांच्या पुतळ्यास कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश संगीता ना. भालेराव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले. तसेच या लोकअदालतला प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी भेट देऊन कामकाजाची पहाणी केली. तसेच दोनशे वर्ष पूर्ण झालेल्या जुन्या न्यायालयाच्या ऐतिहासिक इमारतीस त्यांनी भेट देऊन पहाणी केली.


या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा न्यायाधीश एन.आर. नाईकवाडे, जिल्हा विधी प्राधिकरणच्या सचिव भाग्यश्री पाटील, न्यायाधीश मनिषा द. चराटे-हंपे, रजिस्टार एस.एस. उल्हाने, गणेश सब्बन, सहकार न्यायालयाचे न्यायाधीश बी.एस. लखोटे, कौटुंबिक न्यायालय वकील संघाचे अध्यक्ष ॲड. लक्ष्मण कचरे, उपाध्यक्ष ॲड. सुरेश लगड, कार्याध्यक्ष ॲड. शिवाजी सांगळे, सचिव ॲड. राजेश कावरे, माजी अध्यक्ष ॲड. शिवाजी कराळे पाटील, लेबर कोर्ट वकील संघाचे अध्यक्ष ॲड. दीपक चंगेडे, ॲड. जयेश आमले, ॲड. शेखर बेरड, ॲड. आरती तांबोळी आदी उपस्थित होते.
प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी दैनंदिन न्यायालया समोर वाढती प्रकरणे व एवढ्या मोठ्या प्रकरणांचा निपटारा होण्यासाठी लोकअदालत काळाची गरज बनली असल्याची भावना व्यक्त केली.


न्यायाधीश संगीता ना. भालेराव यांनी लोकअदालतमध्ये समोपचाराने प्रकरणे निकाली काढून न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो. यामध्ये वादी प्रतिवादी यांचा वाद समोपचाराने सोडविण्यासाठी लोकअदालत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी सांगितले. लोकअदालतमध्ये कौटुंबिक, कामगार, सहकार व औद्योगिक न्यायालयातील विविध प्रकरणे समोपचाराने सोडविण्यात आली. लोकअदालत यशस्वी करण्यासाठी प्रबंधक एस.के. मोहोळकर व न्यायालयीन कर्मचारी अर्चना झिंजे, शेखर मेहेत्रे, धीरज नारखेडे, सतीश राऊत, सौ. चव्हाण, एल.एस. जाधव, एस.के. जाधव, एस.बी. अळकुटे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *