हर घर तिरंगा अभियानात सहभागी होण्याचा निर्णय
तर पोलीस पाटीलच्या रिक्त पदाच्या नियुक्तीबाबत ठराव
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे ग्रामपंचायतची विशेष ग्रामसभा शांततेत पार पडली. ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियानात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला. तर पोलीस पाटीलच्या रिक्त पदाची नियुक्ती होण्यासाठी जाती निहाय आकडेवारी शासना पाठविण्याचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला.
विशेष ग्रामसभा सरपंच रुपाली जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ग्रामविकास अधिकारी गोवर्धन राठोड, ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, जिजाबाई जाधव, संगीता जाधव, सारिका शिंदे, सिमा फलके, वैशाली फलके, दिपाली कदम, संगिता आतकर, जनाबाई साबळे, मैनाबाई पाचारणे, ज्ञानदेव कापसे, अरुण काळे, चंदू जाधव, गोपी पाचरणे, दिपक जाधव, दत्ता फलके, नवनाथ फलके, भानुदास ठोकळ, दिपक गायकवाड, नामदेव फलके, अजय ठाणगे आदी उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा ध्वज फडकविण्यात येणार असल्याचे स्पष्ट करुन, राष्ट्रीय ध्वजाची संहिता पालन करून या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. ग्रामसेवकानी गावात पोलीस पाटील नियुक्तीबाबत मार्गदर्शन केले.