• Wed. Feb 5th, 2025

हरवलेल्या अल्पवयीन मुलीचा तपास लावावा

ByMirror

Jun 9, 2022

अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण


अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

अहमदनगर (प्रतिनिधी)- हरवलेल्या अल्पवयीन मुलीचा तपास लागत नसल्याने अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने पोलीस अधीक्षकांना गुरुवारी (दि.9 जून) निवेदन देण्यात आले. आरोपींचे नांवे देऊनही तपास लावला जात नसल्याचा आरोप करुन अपहरण झालेल्या मुलीची आई व समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी 13 जून पासून पोलिस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.


कोपरगाव शहरातून 2 जून पासून अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली आहे. याबाबत कोपरगाव पोलीस स्टेशनला मिसिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या आईने संशय असलेल्या आरोपींची नावे पोलीसांनी दिली आहे. मात्र अद्यापि मुलीचा तपास लागलेला नाही. वारंवार हेलपाटे मारून देखील पोलीस वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.


मुलीच्या जिवाचे काही बरेवाईट झाले की काय? या चिंतेने मुलीचे कुटुंबीय भीतीच्या सावटाखाली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांना धमकी देणारे आरोपी दुसर्‍या दिवशी सापडून त्याला अटक केली जाते. मात्र सर्वसामान्य कुटुंबातील अल्पवयीन मुलगी अनेक दिवस उलटूनही तिचा तपास लागत नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे. त्वरीत कोपरगाव शहरातून हरवलेल्या अल्पवयीन मुलीचा तपास लावण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *