राजपाल परिवाराने कापड क्षेत्रात ब्रँड निर्माण केले -आ. संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- कापड व्यवसायात विश्वसनीय व ब्रॅण्ड स्वरुपात नावरुपाला आलेल्या राजपाल वस्त्र दालनाच्या सावेडी, नगर-मनमाड रोड येथील दुसर्या शाखेचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला. संगमनेर नंतर अहमदनगर शहरातील नागरिकांना एका छताखाली लहान मुलांपासून महिला-पुरुषांचे सर्व प्रकारचे वस्त्र वैभव उपलब्ध होणार आहे.

या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी महापालिकेचे विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, नगरसेवक कुमारसिंह वाकळे, संचालक सोनू राजपाल, आनंद कटारिया, जोगिंदरसिंग राजपाल, पवन राजपाल, मुकेश राजपाल, बंटी राजपाल, सुभाषलाल कटारिया, दिलीपलाल कटारिया, शांतीलाल मुनोत, सतीशलाल मुथा, दिनेश बत्रा, अमित आनंद, राहुल भंडारी, जनक आहुजा, रविंद्र बक्षी, अनिश आहुजा, हर्ष बत्रा, गोल्डी आहुजा, हरजितसिंह वधवा, प्रितपालसिंह धुप्पड, आनंद अग्रवाल आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार संग्राम जगताप म्हणाले की, राजपाल परिवाराने कापड क्षेत्रात एक ब्रँड निर्माण केला आहे. अनेक ब्रँडचे वस्त्र नागरिकांना एका छताखाली वाजवी दरात मिळणार असून, राजपाल व कटारिया परिवाराने शहरात सुरु केलेले दालन लवकरच नावरुपास येणार आहे. शहर चारही बाजूने विस्तारले जात असून, उपनगरांची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. या वस्त्र दालनास उपनगरांसह शहरातील नागरिकांचा देखील प्रतिसाद मिळणार आहे. नगरला व्यवसायासाठी आलेल्यांची नेहमीच भरभराट झाली असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तर सण-उत्सवात एकाच छताखाली सर्वसामान्य कुटुंबापासून ते उच्चवर्गीय कुटुंबीयांना खरेदी करण्याचा आनंद घेता येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सोनू राजपाल यांनी आवड आणि मन जिंकणारी वस्त्र म्हणजेच राजपाल क्लॉथ ही एक ओळख जिल्ह्यात निर्माण झाली आहे. अनेक वर्षापासून कापड व्यवसायात राजपाल क्लॉथने दिलेली सेवा ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. लहान मुलांपासून ते सर्वच वयोगटातील स्त्री-पुरुषांचे सर्व प्रकारचे कपडे येथे उपलब्ध आहे. नामांकित कंपन्यांचे वस्त्र आणि राजपाल हे जणू काही समीकरणच बनले आहे. शहरातील राजपाल वस्त्र दालनाच्या शुभारंभ निमित्त नामांकित सर्वच कंपन्यांच्या कपडे खरेदीवर आकर्षक सवलत देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
आनंद कटारिया म्हणाले की, दसरा, दिवाळी बरोबर प्रत्येक सणवाराला कपड्यांच्या खरेदीसाठी ग्राहकांचा ओढा राजपालकडेच असतो. नामांकित कंपन्यांचे वस्त्र उपलब्ध असल्याने खरेदीसाठी मोठ्या शहरांना जाण्याची गरज नसून, वाजवी दरात ग्राहकांना ब्रॅण्डेड वस्त्र उपलब्ध होत आहे. ग्राहकांचे हित, सचोटी आणि माफक दर या ध्येयाने शहरात व्यावसायिक मूल्य जपली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. दिवाळी-पाडव्यानिमित्त राजपाल वस्त्र दालनात विविध प्रकारचे वस्त्रांचे कलेक्शन उपलब्ध करुन आकर्षक सुट देण्यात आली असून, नगरकरांना भेट देण्याचे संचालकांनी आवाहन केले आहे.
