महिला दिनानिमित्त न्यायाधीश नेत्राजी कंक व न्यायाधारच्या अॅड. निर्मला चौधरी यांचा सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यकर्त्या तथा माजी नगरसेविका डॉ. वर्षा सय्यद यांनी अहमदनगर जिल्हा कौटुंबिक न्यायालयात झालेल्या महिला दिनाच्या कार्यक्रमात कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश नेत्राजी कंक व न्यायाधार संस्थेच्या अध्यक्षा अॅड. निर्मला चौधरी यांचा सत्कार केला.

डॉ. वर्षा सय्यद यांनी जिल्हा कौटुंबिक न्यायालयाच्या माध्यमातून कौटुंबिक वाद मिटवण्याचे व त्यांचे जीवन पुन्हा फुलविण्याचे प्रयत्न करत असलेल्या न्यायाधीश नेत्राजी कंक व न्यायाधार संस्थेच्या माध्यमातून महिलांना योग्य न्यायालयीन मार्गदर्शन करुन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी चळवळ चालविणार्या अॅड. चौधरी यांचा सत्कार करण्यात आल्याचे स्पष्ट केले. डॉ. वर्षा सय्यद या देखील सामाजिक कार्यकर्त्या असून, महिलांच्या प्रश्नावर ते कार्य करत आहेत.