• Sat. Sep 20th, 2025

सकल मातंग समाजाने केली रक्तदानाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

ByMirror

Aug 1, 2023

अण्णाभाऊंचे अनुयायी म्हणून समाजात कार्य करताना दिन-दुबळ्यांची सेवा करावी -अनिल शेकटकर

अहमदनगर (प्रतिनिधी)- सकल मातंग समाजाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती रक्तदानाने साजरी करण्यात आली. सिध्दार्थनगर येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन महाराष्ट्र बालक मंदिर येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले.


रक्तदान शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते व राष्ट्रवादी तालुका सचिव रशीद शेख यांच्या हस्ते झाले. यावेळी शिबिराचे संयोजक तथा माजी नगरसेवक अनिल शेकटकर, भगवान जगताप, विजय वडागळे, विजय पाचरणे, डॉ. सुनील पवार, नामदेव चांदणे, मनेश साठे, साहेबराव पाचारणे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, ओबीसी विभागाचे अमित खामकर, अंकुश मोहिते, केडगाव अध्यक्ष भरत गारुडकर, सरचिटणीस अमोल कांडेकर, उपाध्यक्ष निलेश इंगळे, उमेश धोंडे, लहू कराळे, श्रीरंग अडागळे, डॉ. सुनिल पवार, संतोष नवसुपे, सुनिल उमाप, बाळासाहेब जगधने, सुरेश साठे, दिनकर सकट, विजय पाचारणे, सुनिल सकट, रवींद्र जगताप, जालिंदर शेलार, लक्ष्मणराव ढगे, विनायक जाधव, राजू रोकडे, माऊली रोकडे, दीपक रोकडे, दीपक नेटके, आनंद जगताप, सुनील पारधे आदी उपस्थित होते.


अनिल शेकटकर म्हणाले की, अण्णाभाऊंनी समाज जागृतीचे कार्य करून परिवर्तन घडविण्यासाठी उभे आयुष्य खर्ची केले. शाहिरी, साहित्य, कांदबरी लेखन करून समाज सुधारणेचे अतुलनीय कार्य करुन समाजाला त्यांनी दिशा दिली. अण्णाभाऊंचे अनुयायी म्हणून समाजात कार्य करताना दीन-दुबळ्यांची सेवा करावी. त्यांचे विचार व कार्य तेवत ठेवण्यासाठी योगदान दिल्यास त्यांना खरे अभिवादन ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.


भगवान जगताप म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांचे पदस्पर्श ऐतिहासिक अहमदनगर शहराला लाभले. त्यांनी या शहरात चळवळ देखील चालवली. समाज सुधारकांची जयंती वैचारिक प्रबोधनातून साजरी करणे आवश्‍यक आहे. त्यांच्या संघर्षाला व योगदानाला स्मरण ठेवून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रा. माणिक विधाते यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी उच्च, निच्च भेदभाव न ठेवता माणुसकीची शिकवण दिली. त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन मातंग समाजाच्या वतीने माणुसकीच्या भावनेने राबविण्यात आलेला रक्तदान शिबिराचा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे सांगितले.


संध्याकाळ पर्यंत युवकांसह नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले. रक्तदात्यांचा आयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात आला. या शिबिरासाठी जनकल्याण रक्तपिढीचे विशेष सहकार्य लाभले. शिबिर यशस्वी करण्यासाठी सकल मातंग समाजातील युवकांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *