अहमदनगर (प्रतिनिधी)- राळेगण (ता. नगर) येथील श्रीराम विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. योगशिक्षक सुरेश पाटील यांनी योगाचे महत्व व इतिहास सांगून पुरक हालचालीद्वारे विविध आसनांची माहिती प्रात्यक्षिकांसह दिली. उपस्थित विद्यार्थ्यांकडून योगसाधनेची प्रात्यक्षिके करून घेतली.
विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक बाळासाहेब पिंपळे यांनी प्रास्ताविक केले. मुख्याध्यापिका तारका भापकर यांनी योगदिनाचे महत्व विषद केले. क्रीडा शिक्षक विजय जाधव, राजेंद्र कोतकर यांनी योगगुरुंना सहकार्य करत प्रात्यक्षिके करून घेतली.
यावेळी राजश्री जाधव, संजय भापकर, हरीभाऊ दरेकर, निळकंठ मुळे, सुजय झेंडे, अरविंद कुमावत, रामदास साबळे, विशाल शेलार, बाळासाहेब कुताळ आदी उपस्थित होते.