• Thu. Feb 6th, 2025

शिक्षण क्षेत्रातील ऋषीतुल्य व्यक्तीकत्व मोडक यांचा सत्कार

ByMirror

Sep 7, 2022

नगर क्लब बॅडमिंटन ग्रुपचा शिक्षक दिनाचा उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर क्लब बॅडमिंटन ग्रुपच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्यसाधून शिक्षण क्षेत्रातील ऋषीतुल्य व्यक्तीकत्व तथा हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक यांचा सन्मान करण्यात आला. केडगाव इंडस्ट्रीयल इस्टेट येथील वासन टोयोटा शोरुममध्ये झालेल्या कार्यक्रमात जनक आहुजा यांनी मोडक यांचा सत्कार केला. यावेळी अनिल अ‍ॅबट, हेमचंद्र इंगळे, डॉ. रघुनाथ सांगळे, प्रभाकर बोरकर, रवींद्र बक्षी, सुनील मुथा, राजीव बिंद्रा, अ‍ॅड. जयंत भापकर, गुरुदेव वाही, जवाहर मुथा, बाबुशेठ कराचीवाला, सुभाष दगडखेर, किशोर मनोत आदी उपस्थित होते.


जनक आहुजा म्हणाले की, शहरात मोडक क्लासच्या माध्यमातून अनेक दिग्गज व्यक्तीमत्व घडले आहेत. मोडक परिवाराला शिक्षण क्षेत्राचा मोठा वारसा असून, अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य त्यांनी घडविले आहे. त्यांचे अनेक माजी विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत आहे. शिक्षण दिनानिमित्त समाज घडविण्याचे कार्य करणार्‍या ऋषीतुल्य व्यक्तीकत्वाचा सन्मान करण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


तसेच यावेळी ग्रुपच्या सर्व सदस्यांनी भारतातील प्रतिष्ठित एसयूव्हीच्या यादीत समावेश झालेली व ग्राहक वर्गाच्या प्रतिक्षेत असलेली टोयोटाची द अर्बन क्रुझर हाईराइडरची पहाणी करुन सेल्फ चार्जिंग स्ट्राँग हायब्रीड इलेक्ट्रिक पॉवरट्रेनचा समावेश असलेल्या या कारची विविध वैशिष्टये जाणून घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *