गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आखाड्यासाठी आणलेल्या लाल मातीचे पूजन
विजेत्या मल्लास अर्धा किलो सोन्याची गदा बक्षीस
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात भारतीय जनता पार्टी, शिवसेना व अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने एप्रिल मध्ये तीन दिवसीय छत्रपती शिवराय केसरी निमंत्रित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा रंगणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या स्पर्धेच्या आखाड्यासाठी आणलेल्या लाल मातीचे पूजन करण्यात आले.

आखाडा माती पूजनासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे चेअरमन वसंत लोढा, भाजपचे युवा नेते सुवेंद्र गांधी, जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे, माजी नगरसेवक संभाजी लोंढे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, प्रशांत मुथा, तालिम संघाचे खजिनदार पै. नाना डोंगरे, पै. गोरख खंडागळे, युवा सेनेचे शहर प्रमुख पै. महेश लोंढे, तालिम संघाचे शहराध्यक्ष नामदेव लंगोटे, सचिव मोहन हिरणवाळे, श्याम लोंढे, माजी नगरसेवक सुनिल भिंगारे, पै. राम लोंढे, पै. आदेश बचाटे, संजय ढोणे, प्रताप परदेशी, पै. अक्षय चुकाटे, पप्पू घोडके, ज्ञानेश्वर साळवे, सागर शिंदे, ओमरत्न भिंगारदिवे आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवराय केसरी निमंत्रित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा वाडियापार्क क्रीडा संकुल येथे माती व गादी विभागात रंगणार आहे. या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे विजेत्या खेळाडूस अर्धा किलो सोन्याची गदा बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. द्वितीय विजेत्या मल्लास दोन लाख, तर तृतीय स्पर्धकास एक लाख रुपयाचे बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच विविध वजन गटात लाखो रुपयांचे बक्षीसं ठेवण्यात आली आहे.
या स्पर्धेसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, भाजपचे जेष्ठ नेते अभय आगरकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष महेंद्र (भैय्या) गंधे, शिवसेनेचे बाबुशेठ टायरवाले, शहर प्रमुख दिलीप सातपुते, संपर्कप्रमुख सचिन जाधव, भाजपचे ज्येष्ठ नेते सचिन पारखी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.