अहमदनगर (प्रतिनिधी)- लालटाकी (सध्या राहणार मुकुंदनगर) येथील शकील युसूफ सय्यद (वय 65 वर्षे) यांचे दिर्घ आजाराने नुकतेच निधन झाले. औरंगाबाद रोड, पोखर्डी येथील एस.एस. ट्रक बॉडी बिल्डरचे ते संचालक होते. धार्मिक व सामाजिक कार्यामुळे ते सर्वांना सुपरिचित असल्याने त्यांच्या निधनाने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात आई, तीन भाऊ, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. जलालशाह कब्रस्तानमध्ये त्यांचा अंत्यविधी झाला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
