जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर खेळाडूंची निवड
बॅडमिंटन व क्रिकेटच्या संघाची विभागीय पातळीवर निवड
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या खेळाडू विद्यार्थ्यांनी विविध खेळात यश संपादन करुन जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली आहे. आपल्या उत्कृष्ट खेळाच्या प्रदर्शनाने विद्यालयातील बॅडमिंटन (17 वर्षे वयोगट) व क्रिकेटच्या (14 वर्षे वयोगट) मुलांच्या संघाने शालेय स्तरावर विजेतेपद पटकाविले आहे. या संघांची विभागीय पातळीवर निवड झाली आहे. तर बास्केटबॉल (14 वर्षे वयोगट) मुलींच्या संघाने उपविजेतेपद पटकाविले आहे. तसेच वैयक्तिक खेळाच्या प्रकारात तीन विद्यार्थ्यांची राष्ट्रीय व दोन विद्यार्थ्यांची राज्य पातळीवर निवड करण्यात आली असल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य प्रभाकर भाबड यांनी दिली.
तनिष्का अभिजीत शिंदे (एरोबिक्स), अयान अब्बास शेख (थायबॉक्सिंग), सिध्दी अभय गुगळे (एरोबिक्स) यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी तर कौस्तुभ प्रशांत पुंड (धनुर्विद्या), एकलव्य खैरनार संतोष यांची राज्यपातळीवर निवड करण्यात आली आहे.
मल्लखांब स्पर्धेत आर्यन गोयल, तनिष्का खांडरे, जलतरण स्पर्धेत कौस्तुभ पंडे, रनविजय घोरपडे, श्रवण बल्लाळ, बुध्दीबळ स्पर्धेत देवश्री टाक, कनक जामगावर, श्रेया भागानगरे, राधिका भागानगरे, मयंक भंडारी, मॉर्डन पेटाथलॉन दुर्गाप्रसाद थोरात, अभिनव हराळ, कुस्ती स्पर्धेत शौर्य मदने, आदित्य खताळ, धनुर्विद्या स्पर्धेत ध्रुव हुंडेकरी यांनी जिल्हास्तरावर यश संपादन केले असून, त्यांची विभागीय पातळीसाठी निवड करण्यात आली आहे.
या सर्व खेळाडूंना शालेय क्रीडा शिक्षक आकाश थोरात, विशाल पगारे, प्रितम जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करुन त्यांच्या पुढील वाटचालीस संस्थेच्या प्रमुखकार्यवाह छायाताई फिरोदिया, उपाध्यक्ष अशोक मुथा, सहकार्य गौरव फिरोदिया, खजिनदार प्रकाश गांधी, विश्वस्त सुनंदाताई भालेराव, अॅड. गौरव मिरीकर, प्राचार्य प्रभाकर भाबड, उपप्रचार्या कविता सुरतवाला यांच्यासह सर्व विभाग प्रमुख व शालेय शिक्षकांनी शुभेच्छा दिल्या.

