गुन्हेगारी रोखण्यासाठी गावनिहाय बैठका घेऊन पोलीस मित्र जोडावे -विजय भालसिंग
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुका पोलीस स्टेशनचा पदभार पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी घेतला असता त्यांचा अखिल विश्व वारकरी परिषदेच्या (महाराष्ट्र राज्य) वतीने स्वागत करण्यात आले. वारकरी परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष विजय भालसिंग यांनी देशमुख यांचा सत्कार केला.
विजय भालसिंग म्हणाले की, शिशिरकुमार देशमुख भिंगार हद्दीत कार्यरत असताना गुन्हेगारी प्रवृत्तीविरोधात धाक निर्माण करुन, गुन्हेगारीला त्यांनी आळा घातला. त्यांची उत्कृष्ट ठरलेली कार्यशैली नगर तालुक्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. गाव पातळीवरील गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रत्येक गावनिहाय बैठका घेऊन पोलीस मित्र जोडण्याचे त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना शिशिरकुमार देशमुख यांनी नगर तालुका गुन्हेगारी मुक्त होण्यासाठी व सर्वसामान्यांना भयमुक्तीचे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.