समाज बांधवांचा युवकांना दिशा देण्याकरिता एकजुटीने पुढे जाण्याचा संकल्प
मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघ व सितारामजी घनदाट सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने शहरात आयोजित करण्यात आलेल्या निशुल्क चर्मकार वधू-वर व पालक मेळाव्यात महाराष्ट्रातील समाज बांधव एकवटले. मुला-मुलींच्या विवाहाला स्थळ शोधण्यासाठी एकत्र आलेल्या समाज बांधवांनी युवकांना दिशा देण्याकरिता एकजुटीने पुढे जाण्याचा संकल्प केला. तर यावेळी झालेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

टिळक रोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात झालेल्या या मेळाव्याची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करुन व प्रथम नोंदणी करणारे वधू आणि वरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली व वधू-वर व पालक परिचय समितीचीचे जिल्हाध्यक्ष रामदास सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्याप्रसंगी चेंबुर (मुंबई) नगरसेविका आशाताई मराठे, अभिनेत्री दिपाली कांबळे, डॉ. सागर बोरुडे, रामदास सोनवणे, दिनेश माने, सुनील त्र्यंबके, आदिनाथ बाचकर, मुंबई प्रदेशाध्यक्ष सुभाष मराठे, अरुण गाडेकर, नितीन उदमले, सितारामजी घनदाट सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सर्जेराव गायकवाड, खजिनदार रामराव ज्योतिक, सचिव राजेंद्र धस, मच्छिंद्र दळवी, प्रतिभा खामकर, अण्णासाहेब खैरे, जिल्हाध्यक्ष संतोष कानडे, संजय गुजर, अशोक शेवाळे, संदीप सोनवणे, चांगदेव देवराय, गोरख वाघमारे, मनिष कांबळे, अर्जुन वाघ, संतोष कंगणकर, दत्तात्रय खामकर, अर्जुन कांबळे, संतोष लोहकरे, दिलीप कांबळे, गणेश एडके, गितेश देवरे आदी पदाधिकारी व मोठ्या संख्येने चर्मकार समाज बांधव व महिला उपस्थित होत्या.

प्रदेशाध्यक्ष संजय खामकर म्हणाले की, चर्मकार विकास संघाचे मागील 9 वर्षापासून समाजाच्या न्याय, हक्क व सन्मानासाठी कार्य सुरू आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या जिल्हा व तालुका पातळीवर कार्यकर्त्यांना जोडून सामाजिक कार्य उभे करण्यात आले. समाजाचा विकास हाच एकमेव ध्येय समोर ठेऊन वाटचाल सुरु आहे. समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने विविध निशुल्क उपक्रम समाजासाठी राबविले जात आहे. युवकांना शिक्षण घेऊन देखील नोकरीसाठी संघर्ष करावा लागत आहे. युवा वर्गाची ही समस्या लक्षात घेऊन युवकांना उद्योग, व्यवसायात पुढे आणण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून रविदासिया चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीची स्थापना करण्यात आली आहे. विकासात्मक दृष्टीने समाजाला दिशा देऊन युवकांना बळ देण्याचे काम केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

आशाताई मराठे म्हणाल्या की, समाजाच्या मुला-मुलींनी समाजातच लग्न करावे. हे वधू-वर मेळाव्याच्या माध्यमातून शक्य होणार आहे. समाजातील घरे जोडण्याचे काम वधू-वर परिचय मेळाव्यातून होत आहे. समाजाला एकत्र आणून दिशा देण्याचे कार्य चर्मकार विकास संघ करत आहे. कोरोनाचे संकट असो किंवा इतर कोणतेही संकट, नेहमीच चर्मकार विकास संघ समाजासाठी धावून आलेला असल्याचे त्यांनी सांगितले.
नितीन उदमले म्हणाले की, चर्मकार विकास संघाने समाजाची मूठ बांधण्याचे काम केले. युवकांना दिशा देऊन त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचे सुरु असलेले कार्य दिशादर्शक आहे. एकमेकांना सन्मान देऊन विधायक कार्य सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या मेळाव्यात अभिनेत्री दिपाली कांबळे, राजाराम केदार, नितीन उदमले, मोहन गद्रे यांचा सन्मान करण्यात आला. मोफत आरोग्य तपासणी शिबिरात रक्तगट, मधुमेह, हिमोग्लोबीन, ह्रद्यरोग, पोटविकार, नेत्र तपासणी, दंत तपासणी व अस्थीरोग तपासणी करण्यात आली. या शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टर डॉ. प्रमोद जगताप, डॉ. राहुल गाडेकर, डॉ. भास्कर जाधव,डॉ. राहुल त्रिमुखे, डॉ. भारत साळवे, डॉ. किरण गोरे, डॉ. अनिल जाधव, डॉ. गणेश झरेकर, डॉ. प्रणाली त्रिमुखे, डॉ. रावसाहेब बोरुडे, डॉ. दादासाहेब साळुंखे, डॉ. सारंग बोरुडे, डॉ. सोनल बोरुडे, डॉ. गजानन भोसले, डॉ. चंद्रशेखर केदार, डॉ. अरुण बोरुडे, डॉ. ऋषिकेश उदमले, डॉ. सचिन साळे, डॉ. प्रीती कांबळे, डॉ. गणेश लोखंडे, डॉ. सुकेशनी गाडेकर, डॉ. सारिका दरेकर, डॉ. प्रतीक्षा साळे, डॉ. प्रकाश कांबळे, डॉ. शारदा केदार, डॉ. हेमंत कदम, डॉ. श्रावण कदम, डॉ. ऐश्वर्या पवार, डॉ. सायली शिंदे, डॉ. रामदास शेवाळे यांनी तपासणी केली. या कार्यक्रमात सदर डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविकात रामदास सोनवणे यांनी संघटनेच्या विविध सामाजिक कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कांबळे यांनी केले. आभार संतोष कानडे यांनी मानले. मेळावा यशस्वी करण्यासाठी वधू-वर पालक परिचय समितीचे सदस्य रामदास सातपुते, नानासाहेब शिंदे, अरविंद कांबळे, भारत चिंधे, देवराम तुपे, विलास जतकर, बाबासाहेब आंबेडकर, इंजि. तुकाराम गायकवाड, मिनाताई नन्नवरे, अभिमन्यू चव्हाण, दिलीप दुर्गे, कचरु जाधव, कैलास कांबळे, सुभाष पाखरे, के.बी. जाधव, संपत नन्नवरे, पांडुरंग पाखरे यांनी परिश्रम घेतले.
