नगरसेविका सुवर्णा जाधव, नगरसेवक प्रशांत गायकवाड, दिपक खैरे यांचा पाठपुरावा
रेल्वे स्टेशन रोड हा शहराला जोडणारा महत्त्वाचा रस्ता -दत्ता जाधव
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील ऐतिहासिक लोखंडी पूल ते रेल्वे स्थानक पर्यंतच्या खड्डेमय रस्त्याची महापालिकेच्या वतीने पॅचिंग करण्यात आली. हा रस्ता खड्डेमय बनला असताना नागरिकांच्या सोयीसाठी पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे पॅचिंग करण्याची मागणी नगरसेविका सुवर्णा जाधव, नगरसेवक प्रशांत गायकवाड, दिपक खैरे यांनी केली होती.
सदर रस्त्याच्या पॅचिंगचे काम सुरु झाले असताना समता परिषदेचे महानगर अध्यक्ष दत्ता जाधव, नगरसेवक प्रशांत गायकवाड, दिपक खैरे यांनी कामाची पहाणी करुन संबंधित ठेकेदाराला काम दर्जेदार करण्याबाबत सूचना केल्या. यावेळी आकाश निरभवणे, अजिंक्य पोटे, अमोल रणदिवे, सिध्दार्थ शिंदे, प्रमोद रपारिया, मुस्ताक शेख, महेश वाघमारे, गणेश पालवे, जगदीश कुलकर्णी, सुधीर जायभाय, विलास भिंगारदिवे आदी उपस्थित होते.

दत्ता जाधव म्हणाले की, रेल्वे स्टेशन रोड हा शहराला जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्याची दुरावस्था झाली होती. स्थानिक नागरिकांनी केलेल्या मागणीमुळे सदर रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
प्रशांत गायकवाड म्हणाले की, शहरात येणारे अथवा जाणार्या नागरिकांसह स्थानिक नागरिक व शालेय विद्यार्थ्यांची रेल्वे स्टेशन रोडवर वर्दळ असते. खड्डेमय रस्त्यामुळे अनेक लहान-मोठे अपघात घडत होते. तर स्थानिक नागरिकांना देखील मोठा त्रास सहन करावा लागत होता. सदर दुरुस्तीच्या कामामुळे पावसाळ्यापूर्वी रेल्वे स्थानकचा रस्ता खड्डेमुक्त होणार असल्याचे त्यांनी सांगितले.