• Sat. Mar 15th, 2025

राष्ट्रीय अपंग वित्त विकास महामंडळाचे अध्यक्षांकडे कर्ज वाटपाचे साकडे

ByMirror

Feb 21, 2023

प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेने शिर्डीला केले सेहगल यांचे स्वागत

अहमदनगर (प्रतिनिधी)- शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनाला आलेले राष्ट्रीय अपंग वित्त विकास महामंडळ नवी दिल्लीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राजन सेहगल यांचे प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत करण्यात आले.


शिर्डी येथे सेहगल यांनी सहकुटुंबीय साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्याशी दिव्यांगांच्या स्वयंरोजगारासाठी कर्ज वाटपाबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. लक्ष्मण पोकळे, गणेश हनवते, भारत देशमुख, सरोज इनामदार, पाणगव्हाणे, खासदार सदाशिव लोखंडे यांचे स्वियसहाय्यक नितीन ठाकरे, कैलास यादगुडे आदी उपस्थित होते. शिर्डी संस्थानच्या वतीने सेहगल यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *