• Fri. Sep 19th, 2025

राष्ट्रवादीच्या वतीने महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

ByMirror

Nov 28, 2022

निस्वार्थ भावनेने सामाजिक कार्य करणार्‍यांचा महात्मा फुले समता पुरस्काराने गौरव

त्याग व कार्याची प्रेरणा मिळण्यासाठी लवकरच फुले दांम्पत्यांचा पूर्णाकृती पुतळा उभा राहणार -आ. संग्राम जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षणाचा पाया रोवून महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजाला सुसंस्कारी केले. महिलांपासून शिक्षणाची सुरुवात करून, त्यांनी महाराष्ट्राच्या मातीत क्रांती घडविली. कुटुंबात महिला साक्षर झाल्यास त्या कुटुंबाची प्रगतीपथाकडे वाटचाल असते, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.


महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 132 व्या पुण्यतिथी निमित्त माळीवाडा येथील त्यांच्या पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले कृती समितीच्या वतीने विविध क्षेत्रात निस्वार्थ भावनेने सामाजिक कार्य करणार्‍यांना महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी आमदार जगताप बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष तथा कृती समितीचे अध्यक्ष प्रा. माणिक विधाते, पंडित खरपुडे, अशोक कानडे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, अशोक बाबर, भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर, ओबीसी सेलचे अमित खामकर, व्यापार व उद्योग सेलचे अनंत गारदे, अशोक गायकवाड, बजरंग खरपुडे, मोहन कदम, केडगाव अध्यक्ष भरत गारुडकर, सरचिटणीस गणेश बोरुडे, उपाध्यक्ष अमोल कांडेकर, किशोर डागवाले, डॉ. अजय कांडेकर, नितीन डागवाले, अभिजीत सपकाळ, अनिकेत येमूल, अशोक गोरे, अर्जुन बोरुडे, संतोष हजारे, फुले ब्रिगेडचे दिपक खेडकर, विक्रम बोरुडे, महेश सुडके, अर्जुन चव्हाण, संतोष ढाकणे, आनंद पुंड, दत्तात्रय जाधव, किरण जावळे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


पुढे बोलताना आमदार जगताप म्हणाले की, फुले दांम्पत्यांनी केलेला त्याग व त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळण्यासाठी शहरात लवकरच महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा एकत्रितपणे पूर्णाकृती पुतळा उभा राहणार आहे. या पुतळ्याच्या माध्यमातून समाजाला एक प्रेरणा व दिशा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर सामाजिक योगदान देणार्‍यांचा पुरस्काराने सन्मान करुन त्यांना कार्य करण्यास प्रोत्साहन देण्यात आले आहे. त्यांच्या कार्यातून इतरांना प्रेरणा मिळून समाज सुधारण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रा. माणिक विधाते म्हणाले की, महात्मा फुले यांनी दीनदुबळ्यांना आधार देऊन त्यांच्या उध्दारासाठी शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली. गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी शिक्षणाचे शस्त्र सर्वसामान्यांना दिले. फुले दांम्पत्यांचे कार्य व त्यागाने समाज सावरला असल्याचे त्यांनी सांगितले. तर त्यांच्या प्रेरणादायी कार्याची जाणीव ठेऊन समाजात योगदान देणार्‍यांचा सन्मान करण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विविध क्षेत्रात निस्वार्थ भावनेने सामाजिक कार्य करणारे जालिंदर बोरुडे, उध्दव शिंदे, सचिन गुलदगड, बेबीताई गायकवाड, रेणुका पूंड, डॉ. सुवर्णा गारुडकर, वसंत शिंदे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले कृती समितीच्या वतीने महात्मा फुले समता पुरस्काराने आमदार जगताप यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *