तपोवन रोड येथील नक्षत्रनगर परिसरात वृक्षरोपण
पृथ्वीचे अस्तित्व टिकवण्यासाठी, तिचे सौंदर्य हिरवाईने फुलविण्याची गरज -इंजि. केतन क्षीरसागर
अहमदनगर (प्रतिनिधी)- पृथ्वीचे अस्तित्व टिकवण्यासाठी, तिचे सौंदर्य हिरवाईने फुलविण्याची गरज आहे. जंगल तोड झाल्याने पर्यावरणाचे प्रश्न निर्माण झाले असून, भविष्याचा विचार करुन वृक्षरोपण व संवर्धन चळवळ काळाची गरज बनले असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर यांनी केले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तपोवन रोड येथील नक्षत्रनगर परिसरात वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले. यावेळी इंजि. क्षीरसागर बोलत होते. यावेळी मंगेश शिंदे, आशुतोश पानमळकर, मयूर रोहाकले, किशोर थोरात, अजिंक्य दिवटे, समृद्ध दळवी, पंकज शेंडगे, किरण घुले, ओंकार म्हसे, केतन ढवण, श्रद्धाताई गोसावी आदी उपस्थित होते.

पुढे इंजि. क्षीरसागर म्हणाले की, पर्यावरणाच्या निसर्गचक्रात मनुष्याने अवास्तव हस्तक्षेप केल्याने पर्यावरणाची हानी झाली आहे. यामुळे मानवी जीवनावरही विपरीत परिणाम होत आहे. मनुष्याला जगण्यासाठी वृक्षरोपणाशिवाय पर्याय नाही. ऑक्सीजन देण्याचे काम झाडे करीत असतात, त्यांच्याकडून मिळणार्या ऑक्सीजनरुपी श्वासासाठी वृक्षांना जगविणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. वसुंधरा संवर्धनेचा वसा वृक्षरोपणाने जपला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.