जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशन व जय हिंद वृक्ष बँकेचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशन व जय हिंद वृक्ष बँकेच्या वतीने रविवारी (दि.28 मे) सेल्फ अवॉकिंग मिशन प्रेजेंट्स एक दिवसीय माईंड पॉवर अॅण्ड मेडिटेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स्टेशन रोड, स्वस्तिक चौक येथील हॉटेल रेडियन्स येथे होणार्या या शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन जय हिंदच्या वतीने करण्यात आले आहे.
या शिबिरात माईंड पॉवर प्रशिक्षक तथा व्याख्याते संजीव मलिक मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये महिला, युवक, उद्योजक व विद्यार्थ्यांना उत्तम स्वास्थ्य, चांगले नाते, आर्थिक प्रगती, आत्मिकऊर्जा, आकर्षक व्यक्तिमत्व, माईंड प्रोग्रामिंग, जीवनातील यशाचा कानमंत्र, लहान मुलांशी चांगला व्यवहार, ध्यानधारणा व कुंडलिनी जागृती आदी विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिरात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक असून, नाव नोंदणीसाठी 9834797172 व 7009611245 हा नंबर देण्यात आला आहे.