• Fri. Sep 19th, 2025

युवा सेनेच्या उपशहर प्रमुखपदी मयूर गायकवाड यांची नियुक्ती

ByMirror

Jun 19, 2023

जिल्ह्यात युवा सेनेची मोठी फळी -अनिल शिंदे

अहमदनगर (प्रतिनिधी)- युवा सेनेच्या उपशहर प्रमुखपदी मयूर गुलाब गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांनी गायकवाड यांच्या नियुक्तीची घोषणा करुन त्यांना नियुक्तीपत्र दिले.


अनिल शिंदे म्हणाले की, युवा सेना ही शिवसेनेची मोठी ताकद आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठा युवक वर्ग पक्षाला जोडला गेला आहे. शिवसेनेच्या माध्यमातून गोरगरिबांचे प्रश्‍न सोडविण्याचे कार्य केले जात आहे. शिवसेनेच्या माध्यमातून युवकांना विविध पदाच्या माध्यमातून संधी देण्याचे कार्य सुरु आहे. जिल्ह्यात युवा सेनेची मोठी फळी उभी राहिली असल्याचे त्यांनी सांगितले. तर गायकवाड यांचे सामाजिक कार्य व युवकांमध्ये असलेला जनसंपर्क पाहून त्यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


नवनिर्वाचित युवा सेनेचे उपशहर प्रमुख मयूर गायकवाड यांनी युवकांना संघटित करुन युवा सेनेच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत जाऊन कार्य केले जाणार आहे. सर्वसामान्यांना सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देऊन, विविध प्रश्‍न सोडविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *