युवक-युवतींसह ज्येष्ठांचाही सहभाग
मुलींना स्वसंरक्षणासाठी कराटे हा खेळ उपयुक्त -शिशीरकुमार देशमुख
अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगरमध्ये शोदान इंटरनॅशनल कराटे फेडरेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या कराटे परीक्षेत युवक-युवतींसह ज्येष्ठांनी देखील सहभाग नोंदवला. यामध्ये परीक्षार्थींनी उत्कृष्ट कराटेचे सादरीकरण करुन यलो बेल्टचे मानांकन मिळवले.
परीक्षेत यशस्वी झालेल्यांना भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक शिशीरकुमार देशमुख यांच्या हस्ते बेल्टचे प्रदान करण्यात आले. यावेळी प्रशिक्षक गौस शेख, समीर शेख, अफजल साबील, साहिल सय्यद आदींसह परिसरातील नागरिक व खेळाडू उपस्थित होते.
सहा. पोलीस निरीक्षक शिशीरकुमार देशमुख म्हणाले की, निरोगी आरोग्य व आनंदी जीवनासाठी व्यायाम हा महत्त्वाचा घटक आहे. कराटे खेळातून शारीरिक व्यायाम होऊन स्वसंरक्षणाचे धडे देखील मिळतात. आजच्या काळात मुलींना स्वसंरक्षणासाठी कराटे हा खेळ उपयुक्त ठरत आहे. मुकुंदनगरमध्ये लहान मुलांसह ज्येष्ठांनी देखील सहभाग घेणे, ही प्रेरणादायी बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रशिक्षक गौस शेख म्हणाले की, आरोग्य धनसंपदा समजून प्रत्येकाने मैदानी खेळाकडे वळाले पाहिजे. कराटे या खेळातून शारीरिक व्यायाम, मनाची एकाग्रता व स्वसंरक्षणाचे धडे मिळत असतात. या खेळाला ऑलिम्पिकची देखील मान्यता असून, या खेळात अनेक खेळाडू गुणवत्ता सिध्द करत असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात लहान गटातील अफिफा जुजेन, मंतशा शेख, अब्दुल राजीक, शाहिद शेख, जास्मीन शेख, आदिबा शेख, अलफिया शमसी, अरशीन शेख, शाफिन शेख, आहिद सय्यद, सुलतान शेख, सहेरीश शेख, अफिफा खान, जुझेन खान, आफरा शेख तसेच मोठ्या गटातील अर्शिद सय्यद, मुख्तार सय्यद, कलिम शेख, हामजा शेख, इजान शेख, अमीर सय्यद, साकिब शेख, जहीन पटेल, आयान शेख, इजान शेख, आयान शेख, शाहरुक शेख, अब्दुल्ला शेख यांना यलो बेल्ट प्रदान करण्यात आले.
