भाजीपाला फळफळावळ आडत असोसिएशन व केसरी प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती साजरी
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील मार्केटयार्ड मध्ये दि. भाजीपाला फळफळावळ आडत असोसिएशन व केसरी प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मार्केटयार्डमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन छत्रपतींचा जयघोष करण्यात आला. यावेळी असोसिएशनचे व प्रतिष्ठानचे अशोक लाटे, नंदकिशोर शिकरे, अशोक निमसे, शिवाजीराव गायकवाड, अमित भोर आदी व्यापारी उपस्थित होते.
