• Mon. Oct 27th, 2025

महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी-विक्री संघटनेच्या मेळाव्यात सदस्यांचे रक्तदान

ByMirror

Mar 21, 2023

वाहन खरेदी-विक्रीत येणारे अडचणी व शासनाच्या धोरणावर चर्चा

अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी-विक्री संघटनेचा मेळावा शहरात सामाजिक उपक्रमाने पार पडला. या मेळाव्यात सहभागी झालेल्या वाहन खरेदी-विक्री संघटनेच्या सदस्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.


ओम मंगल कार्यालय येथे झालेल्या मेळाव्याचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी करमळा येथील माजी आमदार नारायण (आबा) पाटील, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक जोशी, संघटनेचे शहराध्यक्ष अशोक चोभे, संतोषजी कोठारी, हाजी अबू बकर, हाजी अमीन, तुकाराम टाक, जलीलभाई फिटर, अविनाश अल्हाट, गोविंद पोकळे, सलीम मुलानी, राहुल शिरसाठ, संदीप यादव, संदीप (बाळू) भंडारी, भुजबळ मामा, भाकरे दादा, पोपट पोकळे, नंदकुमार लांडगे, अंबादास शिरसाठ, हन्नान शेख, गोविंद पालवे, संदीप अडसोडे, सुरेश बडे, फरीद शेख, अस्लम सय्यद आदी उपस्थित होते.


आमदार संग्राम जगताप म्हणाले की, महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी-विक्री संघटनेचे सामाजिक भावनेने सुरु असलेले कार्य कौतुकास्पद आहे. सदस्यांनी रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले. रक्तदानासाठी मनुष्य मनुष्यावरच अवलंबून असल्याने माणुसकीच्या भावनेने घेतलेला उपक्रम प्रेरणादायी असल्याचे सांगितले. तर संघटनेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी त्यांनी आश्‍वासन दिले.
या मेळाव्यात वाहन खरेदी-विक्री करताना येणार्‍या अडचणी, शासनाचे नव-नवीन धोरणाबाबत चर्चा करण्यात आली. या मेळाव्यासाठी जिल्ह्यासह राज्यातील वाहन खरेदी-विक्री करणारे व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *