अहमदनगर (प्रतिनिधी)- भाजप अनुसूचित मोर्चाचे शहर जिल्हा सचिव सुनिल सकट यांना अमरावतीच्या कला फाऊंडेशनकडून भिमराव आंबेडकर पुरस्कार मिळाल्याबद्दल शहर भाजपच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. गांधी मैदान येथील भाजप कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात सकट यांचा शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी सत्कार केला. यावेळी भाजपचे सरचिटणीस अॅड. विवेक नाईक, तुषार पोटे, महेश नामदे, माजी उपमहापौर मालन ढोणे, ओबीसी शहर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, शिवाजी दहिंडे, अनिल सबलोक, महेश तवले, भाजप अनुसूचित मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटोळे, अशोक भोसले, मिलिंद भालसिंग, भगवान खवळे, राजू घोरपडे, सुमित बटुळे, पोपट भोसले, दत्ता गाडळकर आदी उपस्थित होते.
शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी भाजपचे सर्व पदाधिकारी सामाजिक भावनेने कार्य करत असल्याचे स्पष्ट करुन सकट यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले. सुनिल सकट यांनी कोरोना महामारीच्या संकटकाळात सामाजिक भावनेने विविध उपक्रम राबविले. गरजूंना अन्न-धान्य, मास्क व सॅनीटायझरचे वाटप केले. तसेच कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी जनजागृती केली. ते निस्वार्थ भावनेने सामाजिक, कला, शैक्षणिक, पर्यावरण, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देत आहे. गरजू घटकातील विद्यार्थ्यांना आधार देण्याचे कार्य ते सातत्याने करत असून, महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी सामाजिक उपक्रमाने राबवित आहे. तसेच वृक्षरोपण, रक्तदान आदी सामाजिक उपक्रमात त्यांचा सक्रीय सहभाग असतो. या कार्याची दखल घेऊन त्यांना भिमराव आंबेडकर पुरस्कार देण्यात आला आहे.