• Wed. Jun 17th, 2026

Mirrornews24

Marathi News

भिंगारमध्ये राष्ट्रवादीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

ByMirror

Apr 14, 2022

मनुष्याला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकार बाबासाहेबांनी संघर्षाने मिळवून दिला -संजय सपकाळ

अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार शहरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने कॅन्टोमेंट हॉस्पिटल मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास भिंगार शहराध्यक्ष संजय सपकाळ व कॅन्टोमेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष संभाजी भिंगारदिवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी रमेश वराडे, दिपक बडदे, अभिजीत सपकाळ, अर्जुन बेरड, केशव रासकर, काशिनाथ साळुंके, मच्छिंद्र बेरड, सर्वेश सपकाळ बाळासाहेब राठोड, सदाशिव मांढरे, अरुण चव्हाण, मतिन ठाकरे, कॅन्टोमेंट हॉस्पोटलच्या आरएमओ गितांजली पवार, डॉ. सद्दाम कच्ची, कार्तिक कानडे, बाबा आठवले, शशीकांत रायभान आदी उपस्थित होते.


संजय सपकाळ म्हणाले की, दीन, दलित व दुर्बल घटकातील लोकांसाठी डॉ.बाबासाहेबांनी कार्य केले. त्यांच्या अथक प्रयत्नाने स्वातंत्र्यता, समता व बंधुत्वाची मुल्य रुजविणारी घटना असतित्वात आली. मनुष्याला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकार बाबासाहेबांनी संघर्षाने मिळवून दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *