रिपाई महिला आघाडीची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- मागासवर्गीय कुटुंबीयांवर जातीय अत्याचार करणार्या भानस हिवरा (ता. नेवसा) येथील त्या व्यक्तींवर अॅट्रॉसिटी अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) महिला आघाडीच्या वतीने पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी रिपाईचे शहराध्यक्ष सुशांत म्हस्के, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा ज्योती पवार, ओबीसी सेलचे विजय शिरसाठ, लखन सरोदे, प्रकाश भटेजा, आदिल शेख आदी उपस्थित होते.
भानस हिवरा (ता. नेवसा) येथे राहणारे प्रिया वंजारे व किशोर वंजारे या मागासवर्गीय कुटुंबातील व्यक्तींना अनेक वर्षापासून जातीय हीनतेची वागणूक दिली जात आहे. जातीवर बोलून शिवीगाळ केली जात असून, हा अत्याचार ते अनेक दिवसांपासून सहन करत आहे. वंजारे यांच्या घराच्या आवारात त्रास देणार्या कुटुंबातील महिला केरकचरा व इतर घाण टाकत आहे. तिला विरोध केला असता, जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देऊनही संबंधितांवर गुन्हा दाखल करुन कारवाई केली जात नाही. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना फोनवर संपर्क साधून गुन्हा दाखल करुन घेण्याचे सांगून देखील गुन्हा नोंदवून घेण्यात आलेला नाही. अत्याचार करणार्या कुटुंबीयांची गावात मोठी राजकीय वरदहस्त असल्याने पोलीस प्रशासन राजकीत दबावापोटी गुन्हा दाखल करत नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
मागासवर्गीय कुटुंबीयांवर जातीय अत्याचार करणार्या भानस हिवरा (ता. नेवसा) येथील त्या व्यक्तींवर अॅट्रॉसिटी अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपाई महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. संबंधितांवर गुन्हे दाखल न झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.