• Wed. Jan 21st, 2026

बुधवारी फुटबॉलच्या रंगतदार सामन्यात खेळाडूंचे उत्कृष्ट प्रदर्शन

ByMirror

Jul 19, 2023

इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धा

अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्सच्या वतीने अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धा रंगली असून, शालेय संघ आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत आहे. बुधवारी (19 जुलै) झालेल्या सामन्यांमध्ये 14 व 16 वर्ष वयोगटात तक्षिला तर 12 वर्ष वयोगटात ऑक्झिलियम कॉन्व्हेंट संघ विजयी ठरले. तर 12 वर्ष वयोगटात ओएसिस व 16 वर्ष वयोगटात श्री साई इंग्लिश मिडीयम स्कूलच्या संघाने विजय पटकाविला.


सकाळच्या सत्रात 14 व 16 वर्ष वयोगटात ऑक्झिलियम कॉन्व्हेंट विरुध्द तक्षिला स्कूलमध्ये सामना झाला. यामध्ये अनुक्रमे तक्षिला संघाने 4-1 व 1-0 गोलने विजय मिळवला. तर 12 वर्ष वयोगटात 6-0 गोलने ऑक्झिलियम कॉन्व्हेंट संघाने विजय मिळवून पराभवची परतफेड केली.


दुपारच्या सत्रात 12, 14 व 16 वर्ष वयोगटातील श्री साई इंग्लिश मिडीयम स्कूल विरुध्द ओएसिस स्कूलचे तीन सामने झाले. 12 वर्ष वयोगटात ओएसिस स्कूलने 0-3 गोलने विजय मिळवला. 14 वयोगटात झालेला सामन्यात दोन्ही संघानी आक्रमक खेळी केली. यामध्ये 3-3 गोलने शेवट पर्यंत अटीतटीचा झालेला सामना अनिर्णित राहिला. शेवटी 16 वर्ष वयोगटात श्री साई इंग्लिश मिडीयम स्कूलने 3-2 गोलने विजय मिळवला.


स्पर्धेचे पंच म्हणून अभिषेक सोनवणे, सुयोग महागडे, अभय साळवे, प्रभू कुमार, राजेश चव्हाण, सुशील लोट काम पाहत आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिवाजीयन्स अकॅडमीचे अध्यक्ष मनोज वाळवेकर, उपाध्यक्ष खालिद सय्यद, पल्लवी सैंदाणे, व्हिक्टर जोसेफ, जेव्हीअर स्वामी आदी परिश्रम घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *