महिला दिनाचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून बिकट परिस्थितीवर मात करुन पोलीसमध्ये भरती झालेली युवती हर्षाली गोरख भोसले हिचा सन्मान करुन ग्रुपच्या महिला सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, दिपक बडदे, दिलीप ठोकळ, सचिन चोपडा, रमेश त्रिमुख, नामदेव जावळे, सर्वेश सपकाळ, सचिन चेमटे, विकास भिंगारदिवे, दिलीप गुगळे, अभिजीत सपकाळ, मनोहर दरवडे, रतन मेहेत्रे, जालिंदर अळकुटे, दिलीप बोंदर्डे, अशोक पराते, सुधाकर चिदंबर, संतोष रासकर, सुधीर दहीफळे, रामनाथ गर्जे, सिताराम परदेशी, राजू कांबळे, धनंजय नामदे, किरण फुलारी, सुर्यकांत कटोरे, महेश सरोदे, नितीन पाटोळे, सुहास देवराईकर, माजिद शेख, राजू शेख, भिवाजी कांबळे, सिध्दूतात्या बेरड आदी उपस्थित होते.
संजय सपकाळ म्हणाले की, महिला चिकाटी व जिद्दीच्या जोरावर सर्व क्षेत्रात कर्तृत्व सिध्द करीत आहे. कुटुंबाकडे लक्ष देताना महिलांनी आपले आरोग्य व करिअरकडे देखील लक्ष देण्याची गरज आहे. महिला ही कुटुंबाचा आधार असून, तिच्या योगदानाने संसार फुलत असतो. हर्षाली भोसले ही युवती हरदिन मॉर्निंग ग्रुपची सदस्या असून, तिने आपल्या बिकट परिस्थितीवर मात करुन मोठ्या जिद्दीने नुकतेच पिंपरी चिंचवड (जि. पुणे) येथे झालेल्या पोलीस भरतीत चांगले गुण मिळवून पोलीस दलात दाखल झाली आहे. तिने मिळवलेले यश प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.