शहरातील ऐतिहासिक वास्तूंची सफर करुन वॉटर पार्क व सिध्दीबागेत केली धमाल
आमदार संग्राम जगताप वाढदिवसाचा आगळावेगळा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील बालघर प्रकल्पातील वंचित व गरजू घटकातील विद्यार्थ्यांना शहराच्या ऐतिहासिक वास्तूंचे दर्शन घडविणारी सहल राबविण्यात आली. सहलीत विद्यार्थ्यांना अहमद निजामशहा बादशाह यांची समाधी असलेला बागरोजा, दर्गा दायरा, मिरावली पहाड, वॉटर पार्क, चाँदबिबी महाल, फरहाबक्ष महल, रणगाडा संग्रहालय, सिद्धी बागची सफर घडवून, ऐतिहासिक वास्तूंची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी वॉटर पार्क व सिध्दीबागेत धमाल करुन सहलीचा आनंद लुटला.
आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा हॉकर्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष साहेबान जहागीरदार यांच्या पुढाकाराने हा आगळावेगळा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. रविवारी (दि.12 जून) सकाळी आयुर्वेद महाविद्यालय येथून आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झेंडा दाखवून सहलीचे प्रारंभ करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, शाहनवाज शेख, अखलाक शेख, जुनैद शेख, अब्दुल खोकर, वसीम शेख, भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, गफ्फार शेख, दत्ता शिंदे, संतोष रासने, राजू खाडे, कमलेश बायड, अज्जू शेख, फिरोज शेख, नवेद शेख, अन्सार पठाण, समीर शेख, रमिज शेख, मुन्तजीम पठाण, फैयाज शेख आदी उपस्थित होते.
शहराचा इतिहास ज्ञात होण्यासाठी बालघरातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेली सहलीचा उपक्रम कौतुकास्पद असून, विद्यार्थ्यांना आनंदाबरोबर वेगवेगळी ऐतिहासिक माहिती शालेय अभ्यासक्रमात उपयोगी पडणार असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले. साहेबान जहागीरदार म्हणाले की, कोरोनामुळे दोन वर्षापासून फिरायला न गेलेल्या बालघर प्रकल्पातील गरजू घटकातील विद्यार्थ्यांसाठी सहलीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना ऐतिहासिक अहमदनगर शहराची माहिती होण्यासाठी व त्यांना विरंगुळा मिळण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केल्याचे स्पष्ट केले.
या सहलीमध्ये विद्यार्थ्यांसह शिक्षक देखील सहभागी झाले होते. सहलीचा आनंद काय असतो, तो अनुभवून ही सहल विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरली. विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर आनंद फुलले होते.