महात्मा फुलेंनी आधुनिक व क्रांतीकारी विचारांनी पुरोगामी महाराष्ट्राची पायाभरणी केली -दिपक खेडकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- फुले ब्रिगेडच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 132 व्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी फुले ब्रिगेडचे शहराध्यक्ष दिपक खेडकर, महिला जिल्हाध्यक्षा रेणुकाताई पुंड, अमित खामकर, किरण जावळे, महेश गाडे, महेश सुडके, संतोष हजारे, दिलीप चौधरी, सुनिल पुंड, सचिन गुलदगड, संजय सपकाळ, राणीताई आमुत्रे, अमोल कांडेकर, विक्रम बोरुडे, गणेश बोरुडे आदी उपस्थित होते.
फुले ब्रिगेडचे शहराध्यक्ष दिपक खेडकर म्हणाले की, सुशिक्षित समाजाची निर्मिती महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यामुळे झाली. शिक्षणावर ठराविक लोकांची मक्तेदारी त्यांनी मोडित काढून, महिलांसह सर्वांसाठी शिक्षणाचे दारे उघडे करुन दिली. छत्रपती शिवाजी महाराजांना गुरुस्थानी मानून त्यांनी आधुनिक व क्रांतीकारी विचारांनी पुरोगामी महाराष्ट्राची खर्या अर्थाने पायाभरणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.
