• Fri. Mar 13th, 2026

फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेचे अंतिम सामने 18 ऑगस्ट रोजी रंगणार

ByMirror

Aug 12, 2023

फुटबॉलच्या थरारक खेळाचे होणार प्रदर्शन

अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्सच्या वतीने घेण्यात आलेल्या इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेचे 12, 14, 16 वर्ष वयोगटातील व मुलींच्या संघाचा अंतिम सामना शुक्रवार दि. 18 ऑगस्ट रोजी अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर रंगणार आहे.
विविध गटातील शालेय संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन अंतिम सामन्यात पोहचले आहे. अनेक दिवसापासून ही स्पर्धा सुरु होती. अंतिम सामन्यात फुटबॉलचा थरारक खेळ फुटबॉल प्रेमींना पहावयास मिळणार आहे. 12 वर्ष वयोगटातील अंतिम सामना आठरे पाटील स्कूल विरुध्द ऑक्झिलियम कॉन्व्हेंट संघात होणार आहे. तर तिसऱ्या स्थानासाठी आर्मी पब्लिक स्कूल विरुध्द ओएसिस संघात होणार आहे.


14 वर्ष वयोगटातील अंतिम सामना आर्मी पब्लिक स्कूल विरुध्द आठरे पाटील यांच्यात होणार आहे. तिसऱ्या स्थानासाठी सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंट विरुध्द ओएसिस संघात होणार आहे.
16 वर्ष वयोगटातील अंतिम सामना आर्मी पब्लिक स्कूल विरुध्द आठरे पाटील यांच्यात होणार आहे. तिसऱ्या स्थानासाठी तक्षीला विरुध्द श्री साई इंग्लिश मिडीयम स्कूल संघात होणार आहे.


मुलींच्या संघातील अंतिम सामना आर्मी पब्लिक स्कूल विरुध्द श्री साई इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये रंगणार आहे. या गटात कोण बाजी मारतो? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *