नेप्तीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द -जपकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती(ता. नगर) येथे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित सरपंच व विजयी ग्रामपंचायत सदस्यांचा ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. नितीन कदम मित्र मंडळ व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
माजी ग्रामपंचायत सदस्य नितीन कदम यांच्या हस्ते निवडून आलेल्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. माजी सरपंच संजय जपकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी नगरसेवक दत्ताभाऊ जाधव, सोनू घेबुड, सरपंच सविता जपकर, माजी सरपंच संजय जपकर, संजय अशोक जपकर माजी पं.स. सदस्य देवा होले, साई संजीवनी प्रतिष्ठानचे प्रा.एकनाथ होले,रामदास फुले, सुधाकर कदम, दिलीपराव होळकर, शिवाजी होळकर, जालिंदर शिंदे, भानुदास फुले, मच्छिंद्र होळकर, महेंद्र चौगुले, एकनाथ जपकर, बाबासाहेब होळकर, फारूक सय्यद, दादू चौगुले, संभाजी गडाख, बंडू जपकर, नानासाहेब बेल्हेकर, विलास जपकर, बाबासाहेब जाधव,
बंडू कांडेकर, रामराव कांडेकर, गणेश कदम, नंदू जाधव, प्रा. सिताराम जपकर, गजानन होळकर, बाळासाहेब गाडेकर, राजाराम जपकर, नाथा जपकर, ज्ञानेश्वर जपकर, आकाश गाडेकर, शिवाजी गाडेकर, राजू गाडेकर, सुनील गाडेकर, शेखर कांडेकर, शाहू होले, सौरभ भुजबळ, सुरेश कदम, सागर गाडेकर, योगेश गाडेकर, सचिन होले, योगेश होळकर, अंकुश चौधरी, अतुल औटी, किरण मेंढे, संतोष जपकर, गणेश होळकर, आकाश फुले, अमोल कांबळे, सचिन निकम, बंटी शेख, मंगेश गरड, सचिन सुरसे, शैलेश लाटणे आदींसह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी सरपंच संजय जपकर म्हणाले की, नेप्तीच्या विकासासाठी कटिबध्द राहणार आहे. सर्व सदस्यांना बरोबर घेऊन विकास कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. जनतेने टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात एकनाथ होले यांनी राजकारण निवडणुकांपुरते होते. गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.
