आमदार जगताप व पदाधिकार्यांच्या आश्वासनाने उपोषण मागे
अहमदनगर (प्रतिनिधी)- नागापूर उपनगरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व समाज मंदिर (बुद्ध विहार) उभारण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई) वतीने नागापूरला पुतळा उभारणी करण्यात येत असलेल्या नियोजित जागेत उपोषण करण्यात आले. आमदार संग्राम जगताप, मनपाचे उपायुक्त यशवंत डांगे व अधिकारी यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन सदर प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.
या उपोषणात रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, महिला शहर जिल्हाध्यक्षा ज्योती पवार, संपदा म्हस्के, पूजा साठे, सोनाली बनसोडे, सोनाली भाकरे, संगीता पाटोळे, सोनाली भाकरे, मंगल चांदणे, अर्चना भाकरे, शारदा पाडळे, ज्योती रणधीर, मीना भाकरे, ललिता ठोंबे, पायल भाकरे, बेबी भाकरे, मैनाबाई भाकरे, मार्गरेट भाकरे, इंदूबाई भाकरे, सुशीला भाकरे, संदीप वाघचौरे, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष गुलाम शेख, नईम शेख, ओबीसी विभागाचे विजय शिरसाठ, हर्षल जाधव, सचिन शिंदे, पप्पू डोंगरे, जमीर इनामदार, जमीर शेख, जावेद सय्यद, आदिल शेख, मुन्ना भिंगारदिवे, सोहेल शेख, उमेश गायकवाड, अनिकेत पवार आदींसह परिसरातील नागरिक सहभागी झाले होते.
नागापूर भागात आंबेडकरी चळवळीतील जनसंख्या ही मोठी आहे. उपनगर हा झपाट्याने वाढला असून, या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा नसल्याने त्यांना वंदन करणे अडचणीचे होते. या ठिकाणी महापालिकेच्या जागेत बुद्ध विहार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारल्यास आंबेडकरी चळवळीतील नागरिकांची सोय होणार आहे. बुद्ध विहारच्या माध्यमातून इतर धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रम घेता येणार असल्याचे रिपाईने स्पष्ट केले आहे. तर नागपूर राजवाडा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तसेच बुद्ध विहार उभारण्याची मागणी केली आहे.