महाराजांच्या पूर्ण कृती पुतळ्याभोवती राजवाड्याचा देखावा
अहमदनगर (प्रतिनिधी)- नवनागापुर येथे स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठान व युवा सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. नवनागापुर येथील चौकात भव्य स्टेजवर राजवाड्याची सजावट करुन शिवाजी महाराजांचा पूर्ण कृती पुतळा अभिवादनासाठी ठेवण्यात आला होता. यावेळी युवकांनी जय भवानी… जय शिवाजी… च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
प्रारंभी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश गलांडे, सरपंच डॉ. बबन डोंगरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, आकाश कातोरे, श्यामराव पिंपळे, गोरख गव्हाणे, बाबासाहेब डोंगरे, शंकर शेळके, अशोक शेळके, डॉ. संजय गडगे, दिपक गिते, विवेक घाडगे, उद्योजक अमोल घोलप, अमित बारवकर, वैभव सुरवसे, प्रदीप कारंडे, अर्जुन सोनवणे, रमेश शिंदे, संतोष शेवाळे, स्वप्नील खराडे, हर्षद बिंरगळ, निलेश शेवाळे, तुषार शेवाळे, अमोल घुटे, गौरव पाटोळे, वैष्णव गलांडे, शुभम शिंदे, शुभम टंकसाली, शिवराज गलांडे, राम घुगे, वसीम शेख, विशाल गीते, संग्राम राऊत, अरबाज शेख आदी उपस्थित होते.

योगेश गलांडे म्हणाले की, शिवाजी महाराजांनी समता व बंधुत्वाच्या मुल्यांवर स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवली. समाजातील अन्याय, अत्याचार, दडपशाहीचा त्यांनी बीमोड करुन, प्रजेचे हित हेच अंतिम ध्येय समजून राज्यकारभार केला. त्यांचे विचार व संस्काराने आदर्श राज्याचा उदय झाला. याच विचाराने महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार कल्याणकारी कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.
