नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास प्रभागातील नगरसेवकांचे सातत्याने प्रयत्न सुरु -अल्ताफ सय्यद
अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यपदी नगरसेवक सुनील त्र्यंबके यांची निवड झाल्याबद्दल अकबर नगरमध्ये त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. शरद पवार विचारमंचचे जिल्हाध्यक्ष अल्ताफ सय्यद व सामाजिक कार्यकर्ते राजू खान यांनी त्र्यंबके यांचा सत्कार केला.
यावेळी नगरसेवक विनीत पाऊलबुध्दे, बाळासाहेब पवार, समीर खान, अन्सार शेख, रिजवान खान, राजू जागीरदार, सहाब सय्यद, मुजीर सय्यद, दिशान सय्यद, फुरकान सय्यद आदी उपस्थित होते.
अल्ताफ सय्यद म्हणाले की, प्रभाग दोन मधील नगरसेवकांच्या प्रयत्नाने अकबरनगर व तपोवन भागाचा कायापालट झाला आहे. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास प्रभागातील नगरसेवकांचे सातत्याने प्रयत्न सुरु असते. सुनील त्र्यंबके याची स्थायी समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याने या परिसरातील प्रश्न सुटण्यास आनखी मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राजू खान म्हणाले की, यांनी या प्रभागातील तीन नगरसेवकांना स्थायी समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. पोट तिडकीने प्रभागातील चारही नगरसेवक काम करत असून, त्यांच्या प्रयत्नाने नागरी प्रश्न सुटण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले.